शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

कमानी उभारण्यास मनाई

By admin | Updated: June 15, 2017 04:50 IST

निगडी ते आकुर्डी दरम्यान पालखी मार्गावर सेवाभावी संस्था, सार्वजनिक मंडळे, राजकीय पदाधिकारी यांना मंडप, स्टॉल किंवा कमानी उभारण्यास मनाई केली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : निगडी ते आकुर्डी दरम्यान पालखी मार्गावर सेवाभावी संस्था, सार्वजनिक मंडळे, राजकीय पदाधिकारी यांना मंडप, स्टॉल किंवा कमानी उभारण्यास मनाई केली आहे. दहशतवादी कारवाईची शक्यता लक्षात घेऊन सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आणि पालखी मार्गाला अडथळा ठरू नये, याकरिता महापालिकेची एक कमान व स्वागत कक्ष वगळता अन्य कोणत्याही संस्थेला परवाने देण्यात येऊ नयेत, अशी सूचना पोलिसांनी महापालिका आयुक्तांना पत्राद्वारे केली आहे. संत तुकाराममहाराज पालखी सोहळा १७ जूनला आकुर्डीत मुक्कामी येणार आहे. सोहळा शहरात आल्यानंतर ठिकठिकाणी विविध संस्था, संघटना, मंडळे,राजकीय पदाधिकाऱ्यांमार्फत वारकऱ्यांचे स्वागत करण्यासाठी, अन्नदान करण्यासाठी मंडप, स्वागत कमानी उभारण्यात येतात. मात्र, या मंडप आणि कमानींमुळे पालखी मार्गाला अडथळा निर्माण होतो. दहशतवादी कारवायांची शक्यता लक्षात घेऊन सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून कमानी आणि मंडप अडचणीचे ठरू शकतात. त्यामुळे निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार पळसुले यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना पत्र दिले आहे. कोणत्याही संस्था, संघटनेला स्वागत कमान अथवा मंडप टाकण्यासाठी परवाने देण्यात येऊ नयेत, अशी सूचना पत्राद्वारे केली आहे. महापालिकेच्या वतीने केवळ एकच कमान आणि स्वागत कक्ष निगडी जकात नाका येथे उभारण्यात यावा. पालखी मार्गावर भाविकांना वाटप करण्यात येणाऱ्या अन्नपदार्थांच्या तपासणीसाठी आरोग्य विभागाकडून अन्न निरीक्षकासह पथकाची नेमणूक करावी. लहान रस्त्यांवर लाकडी बॅरिकेड्स लावून रस्ते बंद करावेत. भक्ती-शक्ती चौक ते आकुर्डीत अग्निशामक बंब, रुग्णवाहिका, वैद्यकीय पथक राखीव ठेवावे. मार्गावरील कचराकुंड्या तपासणी, अनावश्यक कचराकुंड्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अन्यत्र हलविण्यासाठी स्वतंत्र पथक नेमावे, मोकाट जनावरे पकडण्यासाठी स्वतंत्र पथक नेमावे. मंदिराजवळ बॅरिकेड्स करावेत.परवानगी नाकारल्यास रास्ता रोकोराखीव जनरेटर, सीसीटीव्ही कॅमेरे, दोन वॉच टॉवर, भरपूर प्रकाशव्यवस्था करावी. महापालिका स्वागत कक्षासह गर्दीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. पालखी मार्गावरील नादुरूस्त दिवे, डीपी बॉक्स दुरुस्त करावेत, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. प्रशासनाकडून मंडप उभारण्यास मनाई केली जात आहे, असा आरोप करत सचिन काळभोर यांनी प्रशासनाचा निषेध केला आहे. याबाबत आयुक्तांना निवेदन दिले आहे. पालखी आगमनावेळी शहरातील विविध संस्था, संघटनांना मंडप उभारण्यास परवानगी नाकारल्यास पालखी सोहळा पिंपरी-चिंचवड शहरातील निगडी जकात नाका येथे महामार्ग अडवून रास्ता रोको करण्यात येईल.