शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट सिटीसाठी पाठपुरावा सुरूच!

By admin | Updated: February 6, 2016 01:32 IST

अजूनही प्रयत्न सुरू आहेत, मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय मंत्र्याकडे पाठपुरावा करून ‘स्मार्ट सिटी’ योजनेत समावेश व्हावा यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचा सूर पुन्हा एकदा खासदार, आमदारांनी आळवला.

पिंपरी : अजूनही प्रयत्न सुरू आहेत, मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय मंत्र्याकडे पाठपुरावा करून ‘स्मार्ट सिटी’ योजनेत समावेश व्हावा यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचा सूर पुन्हा एकदा खासदार, आमदारांनी आळवला. या योजनेच्या यादीत पुण्याला दुसऱ्या क्रमांकाचे स्थान मिळाले. मात्र, पिंपरी-चिंचवडला यामधून डावलले. लोकप्रतिनिधी मात्र शहराच्या समावेशाबाबत प्रयत्नशील असल्याचे बोलत आहेत. नागरिकांना मात्र स्मार्ट सिटीत समावेशाठी प्रतीक्षाच करावी लागणार आहे. (प्रतिनिधी)‘स्मार्ट सिटी’चा विषय अजून संपलेला नाही. पहिल्या यादीत पिंपरी-चिंचवडचे नाव आले नसले, तरी दुसऱ्या यादीत नक्की येईल. त्यासाठी जोरदार पाठपुरावा करणार आहे. सुरुवातीला शहराचे नाव जाहीर झाले त्या वेळी आम्ही केलेल्या विकासामुळेच जाहीर झाल्याचा डांगोरा राष्ट्रवादी काँगे्रसने पिटला. ‘चांगले केले, तर आम्ही केले अन् वाईट झाले की, दुसऱ्यांनी केले, अशी दुटप्पी भूमिका राष्ट्रवादीची आहे. मात्र, आम्ही प्रयत्न सोडणार नाही. - अमर साबळे (खासदार, राज्यसभा)‘स्मार्ट सिटी’ योजनेत समावेश झाल्यास निश्चितच शहराला फायदा होणार आहे. पहिल्या टप्प्यात संधी मिळाली नसली, तरी दुसऱ्या टप्प्यात शहराचा समावेश होईल. त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी पाठपुरावा करीत राहणार आहे.- श्रीरंग बारणे (खासदार, मावळ लोकसभा) शहराचा ‘स्मार्ट सिटी’ योजनेत समावेश होण्यासाठी आम्ही सुरुवातीपासूनच आग्रही आहोत. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आहे. पुण्याप्रमाणे पिंपरी-चिंचवडचाही समावेश झाल्यास शहराला स्मार्ट करता येईल. शहराचाही स्मार्ट सिटी योजनेमध्ये समावेश होण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करीत राहणार आहे. - गौतम चाबुकस्वार (आमदार, पिंपरी)मुख्यमंत्र्यांसह वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा सुरू आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदनही देण्यात आले आहे. या योजनेत समावेश झाल्यास अधिक गतीने विकास करणे शक्य होईल. नवीन प्रकल्प राबविता येतील. याबाबत वेळोवेळी पाठपुरावा सुरूच ठेवणार आहे. - महेश लांडगे (आमदार, भोसरी)