शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

फॉगिंग मशिन खरेदीत घोटाळा

By admin | Updated: March 8, 2016 00:59 IST

महापालिकेच्या आरोग्य विभागासाठी खरेदी करण्यात येत असलेल्या धूरफवारणी मशिनखरेदीत घोटाळा होत असल्याचे उघड झाले आहे

पिंपरी : महापालिकेच्या आरोग्य विभागासाठी खरेदी करण्यात येत असलेल्या धूरफवारणी मशिनखरेदीत घोटाळा होत असल्याचे उघड झाले आहे. बाजारात एक मशिन ७ ते १० हजारांना उपलब्ध असताना प्रत्येकी २५ हजार ४४९ रुपये याप्रमाणे एकूण १४ नगांची मशिन खरेदी करणार आहे. त्यामुळे सुमारे सव्वा दोन लाखांचा घोटाळा आहे. त्याबाबतचा प्रस्ताव मंगळवारी होणाऱ्या स्थायी समिती सभेपुढे मंजुरीसाठी ठेवला आहे. त्याला नगरसेविका आशा शेंडगे यांनी विरोध केला आहे. महापालिकेने बाजारभावापेक्षा जादा दराने साहित्य खरेदीचा धडाका लावला आहे. महापालिकेने यापूर्वी बाजारात १० ते १२ लाखांना उपलब्ध असणारे अत्याधुनिक सोनोग्राफी मशिन २२ लाखांना, सात हजार रुपयांना मिळणारे श्रवणयंत्र मशिन १३ हजार रुपयांना खरेदी करण्याचा घाट घातला होता. ही खरेदी चुकीची असल्याचे नगरसेविका सीमा सावळे, आशा शेंडगे यांनी उघडकीस आणले होते. त्यावर महापालिकेच्या दक्षता समितीनेही शिक्कामोर्तब केले होते. पितळ उघडे पडल्यानंतर प्रशासनाने या सर्व साहित्याच्या खरेदीसाठी फेरनिविदा मागविली होती. त्यात कमी दराच्या निविदा प्राप्त होऊन करदात्यांच्या पैशांची बचत झाली होती. विविध साहित्याची जादा दराने खरेदी करून महापालिकेतील सत्ताधारी नागरिकांच्या पैशांची अक्षरश: लूट करत आहेत. महापालिकेने बाजारभावापेक्षा जादा दराने साहित्य खरेदीचा धडाका लावला आहे. त्यामुळे करदात्यांच्या पैशाची मोठ्या प्रमाणात लूट होत आहे, अशी टीका परिसरातील नागरिकांमधून होत आहे.करदात्यांच्या पैशांची लूट थांबविण्याची गरज आहे.(प्रतिनिधी)