शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
2
Maharashtra Politics : "मला खूप आनंद झाला, सुरुवात चांगली झाली"; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं
3
₹२ च्या मजुरीपासून ते ₹२००० कोटींच्या मालक; पद्मश्री मिळवणाऱ्या अकोल्याच्या कल्पना सरोज यांचा कसा होता प्रवास
4
"मराठी माणसाच्या हितासाठी..." मनसे प्रमुख राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, काय झाला संवाद?
5
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
6
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
7
नोएल टाटांनी करुन दाखवलं! अशी कामगिरी करणारा टाटा ग्रुप पहिलाच भारतीय ब्रँड; दुसरा-तिसरा कोण?
8
Mumbai: पालकांनो लक्ष द्या! १ जुलैपासून तुमच्या मुलांना घ्यायला व सोडवायला शाळेची बस न येण्याची शक्यता
9
...म्हणून मुलांना जन्म देण्यास टाळाटाळ करताहेत भारतीय जोडपी, समोर आलं धक्कादायक कारण
10
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
11
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
12
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
13
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
14
Maratha Reservation Supreme Court: मराठा आरक्षणावर आता जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी
15
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex १५० अंकांनी वधारला; Tata Motors, Reliance, HCL Tech मध्ये तेजी
16
Prada : कोल्हापुरी चप्पलसाठी संभाजीराजे मैदानात; फेसबुक पोस्ट करुन केली मोठी मागणी
17
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
18
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
19
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
20
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'

भक्ती-शक्ती चौकात उभारणार उड्डाणपूल

By admin | Updated: May 25, 2017 02:54 IST

निगडी येथील भक्ती-शक्ती चौकात ग्रेड सेपरेटर आणि उड्डाणपूल उभारण्याच्या प्रस्तावाला स्थायी समिती सभेत बुधवारी मंजुरी देण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : निगडी येथील भक्ती-शक्ती चौकात ग्रेड सेपरेटर आणि उड्डाणपूल उभारण्याच्या प्रस्तावाला स्थायी समिती सभेत बुधवारी मंजुरी देण्यात आली. या कामासाठी ९० कोटी ५३ लाख रुपये खर्च येणार आहे. या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. उड्डाणपूल व ग्रेड सेपरेटर उभारताना भक्ती-शक्ती शिल्पसमूह आणि चौकाच्या सौंदर्याला बाधा पोहोचणार नाही, याची काळजी घेण्याची सूचना स्थायी समितीच्या सर्व सदस्यांनी अधिकाऱ्यांना केली.महापालिकेने जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावर निगडी ते दापोडी यादरम्यान बीआरटीएस रस्ता विकसित केला आहे. हा रस्ता सिग्नल फ्री करण्यासाठी पिंपरी, चिंचवड स्टेशन आणि आकुर्डी येथील खंडोबामाळ चौकात ग्रेड सेपरेटर व नाशिक फाटा येथे उड्डाणपूल उभारला आहे. निगडी येथील भक्ती-शक्ती चौकात वाहतूककोंडीची प्रचंड मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यावर मात करण्यासाठी महापालिका प्रशासनाने भक्ती-शक्ती चौकात उड्डाणपूल आणि ग्रेड सेपरेटर उभारण्याचा प्रस्ताव तयार केला. स्थायीच्या अध्यक्षा सीमा सावळे व सदस्यांनी उड्डाणपूल व ग्रेड सेपरेटर उभारताना भक्ती-शक्ती शिल्पसमूह व चौकाच्या सौंदर्याला बाधा पोहोचणार नाही, याची काळजी घेण्यास अधिकाऱ्यांना सांगितले.