शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

फ्लेक्सच्या सांगाड्यांमुळे वाढला अपघाताचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 02:37 IST

नागरिकांच्या तक्रारीची प्रशासन घेईना दखल

रावेत : शहर परिसरात विविध ठिकाणी धोकादायकपणे फ्लेक्स उभे आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. याकडे महापालिका प्रशासन दुर्लक्ष करीत आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील विविध भागात अनधिकृतपणे फ्लेक्स उभे आहेत. चिंचवड, हिंजवडी, वाकड, रावेत, पुनावळे, मोशी परिसरात मोठ्या प्रमाणावर धोकादायक सांगाडे उभे आहेत. रावेत धर्मराज चौक हा वर्दळीचा असून, येथून रावेत मार्ग, द्रुतगती मार्ग, वाल्हेकरवाडी, आकुर्डी रेल्वे स्टेशन, निगडी प्राधिकरण, शिंदे वस्ती, इस्कॉन मंदिर परिसरातील महाविद्यालये आदी ठिकाणी जा-ये करण्यासाठी दररोज हजारो दुचाकी आणि चारचाकी वाहने या चौकातून जात असतात.अभियांत्रिकी आणि फार्मास्युटिकल, पॉलिटेक्निक महाविद्यालय असल्याने येथे हजारोच्या संख्येने विद्यार्थ्यांची वर्दळ असते.त्यामुळे हा चौक नेहमी गजबजलेला असतो. काही दिवसांपूर्वी या चौकातील वाहतुकीस अडथळा निर्माण करणारी अनधिकृत दुकाने, टपऱ्या अतिक्रमण विभागाने काढून चौक मोकळा केला. परंतु मुख्य चौकालगतच धोकादायक होर्डिंग का हटविले नाहीत, असा प्रश्न आहे.सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवरकाही ठिकाणी धोकादायक इमारतींवर होर्डिंग उभारण्यात आल्याचेही दिसत आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी उंचावरही होर्डिंग आहेत. ती गजबजलेल्या ठिकाणी असल्याने त्याच्याही सुरक्षेची तपासणी करण्याची गरज निर्माण झाली आहे. होर्डिंगला कोसळू नये म्हणून योग्य ती काळजी घेतलेली दिसून येत नाही.जाहिरात होर्डिंगवर हवा आरपार जाण्याकरिता छिद्रे केली जातात पण या होर्डिंगवर तशी सोय नसल्यामुळे ते कधीही कोसळण्याची शक्यता नाकारता येणार नाही. भविष्यात होणारा जीवघेणा अपघात टाळावा याकरिता प्रशासनाने त्वरित दखल घ्यावी. पुण्यात झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने योग्य ती दखल घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.वादळी वाऱ्याने उभारण्यात आलेले होर्डिंगचे खांब उन्मळून पडल्याची उदाहरणे आहेत. सुदैवाने त्यामध्ये जीवितहानी झालेली नाही. मात्र पावसाच्या पाण्याने होर्डिंगचे लोखंडी खांब गंजून ते खराब होतात. त्याकडे मात्र गांभीर्याने पाहिले जात नाही. त्यामुळे अपघात होण्याची भीती नाकारता येत नाही.महापालिकेचे उत्पन्न वाढीच्या दृष्टीने आकाशचिन्ह व परवाना विभागाने नोव्हेंबरमध्ये स्वतंत्र जाहिरात धोरण अर्थात जाहिरात होर्डिंग-आउटडोअर अ‍ॅडव्हर्टायझिंग पॉलिसी तयार केलेली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरात लावण्यात येणाºया जाहिरात होर्डिंगसाठी यापुढे महापालिकेची परवानगी बंधनकारक असणार आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड