शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवकांसह कुटुंबासाठी पाच लाखांची विमा योजना; स्थायी समितीची मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 02:35 IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील १२६ नगरसेवकांसाठी वार्षिक पाच लाख रुपयांची आरोग्य विमा योजना राबविण्यात आली आहे.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील १२६ नगरसेवकांसाठी वार्षिक पाच लाख रुपयांची आरोग्य विमा योजना राबविण्यात आली आहे. ही योजना नगरसेवकांसह पत्नी अथवा पती आणि २१ वर्षांपर्यंतच्या दोन अपत्यांसाठी लागू आहे. या योजनेसाठी २८ लाख ६४ हजार ८६५ रुपये खर्च होणार आहेत. या योजनेस स्थायी समितीने मंगळवारी झालेल्या सभेत मान्यता दिली. सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती ममता गायकवाड होत्या.पिंपरी-चिंचवड महापालिकेत नगरसेवकांचे संख्याबळ १२८ आहे, तर पाच स्वीकृत सदस्य असे एकूण १३३ नगरसेवक आहेत. नगरसेवक आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी महापालिकेतर्फे आरोग्य विमा योजना लागू करण्यात आली. मात्र, १२८ पैकी सात नगरसेवकांनी आरोग्य विमा योजनेची सवलत स्वीकारण्यास यापूर्वीच नकार दर्शविला आहे. त्यामुळे १२१ अधिक पाच स्वीकृत अशा १२६ नगरसेवक आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी पाच लाखांपर्यंत आरोग्य विमा योजना लागू करण्यात येणार आहे. हा विमा नगरसेवक दाम्पत्य आणि त्यांच्या २१ वर्षापर्यंतच्या दोन अपत्यांसाठी लागू राहील.महापालिकेतर्फे मार्श इंडिया इन्शुरन्स ब्रोकर्स प्रायव्हेट लिमिटेड या विमा कंपनीकडून विमा काढण्यात आला आहे. एक वर्षासाठी ५ लाख रुपये इतक्या रकमेच्या आरोग्य विमा योजनेस मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्यामुळे पुढील वर्षाच्या आरोग्य विमा योजनेसाठी मार्श इंडिया इन्शुरन्स ब्रोकर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला २८ लाख ६४ हजार ८६५ रुपये अदा करण्यात येणार आहेत. तसेच २०२२ अखेर असणाऱ्या माजी नगरसदस्याचे आरोग्य विम्याचे दर वर्षी नूतनीकरण करण्यासही मान्यता देण्यात आली.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMuncipal Corporationनगर पालिका