शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

भिशीवाल्यांची उडाली तारांबळ

By admin | Updated: November 13, 2016 04:22 IST

काळ्या पैशाला पायबंद घालण्यासाठी हजार, पाचशेच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा केंद्र शासनाने निर्णय घेतला. त्यानंतर जुन्या नोटा जमा करण्यासाठी आणि नवीन नोटा

पिंपरी : काळ्या पैशाला पायबंद घालण्यासाठी हजार, पाचशेच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा केंद्र शासनाने निर्णय घेतला. त्यानंतर जुन्या नोटा जमा करण्यासाठी आणि नवीन नोटा बँकेतून घेण्यासाठी राष्ट्रीयीकृत बँका, सहकारी बँकांमध्ये नागरिकांच्या रांगा लागल्या आहेत. दरमहा भिशी चालविणारे या महिन्यात अडचणीत आले आहेत. ज्याला भिशी लागली आहे, तो चलनातून रद्द झालेल्या नोटा स्वीकारण्यास तयार नाही. नव्याने चलनात आलेल्या नोटा उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे या महिन्यातील भिशीचे व्यवहार ठप्प झाले आहेत.भिशीच्या माध्यमातून दरमहा कोट्यवधींची आर्थिक उलाढाल होत असते. अगदी १२ पासून ते ५० लोक एकत्र येऊन भिशी चालवतात. वर्षातून एकदा किंवा दोनदा भिशी नंबर काढला जातो. एकूण सदस्यांची जमा होणारी एकत्रित रक्कम ज्याला नंबर लागला आहे, त्याला दिली जाते. व्यापारी, उद्योजक यांची भिशीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल होते. व्यवसायासाठी लागणारी रक्कम अशा भिशीच्या माध्यमातून उभी केली जाते. मोठी रक्कम बँकेत ठेवल्यास अडचण निर्माण होऊ शकते, ही भीती त्यांच्यापुढे आहे. (प्रतिनिधी)सावकारही अडचणीतप्रतिदिन विशिष्ट टक्केवारीने कोट्यवधींची रक्कम व्याजाने देणारे सावकार शहरात आहेत. व्याजाने फिरवलेल्या रकमा आणि त्यावरील व्याज वसूल करण्यात या सावकारांना अडचणी येत आहेत. ज्यांना व्याजाने पैसे दिले आहेत, त्यांच्याकडून आगाऊ तारखेचे धनादेश सावकारी व्यवसाय करणाऱ्यांनी ठेवून घेतले आहेत. मुद्दलाची रक्कम नंतर घेता येईल, अशी मानसिकता करून सावकार निश्चिंत असले तरी दरमहा, दररोज जमा होणारी व्याजाची रक्कम मिळण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. व्याजाने देण्यासाठी घरात कायम ठेवण्यात येणाऱ्या नोटा चलनातून बाद झाल्या आहेत. त्यामुळे सावकारांचे व्याजावर रक्कम देण्याचे व्यवहार थांबले आहेत.