शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

चिंचवडमधील केशवनगरात भंगाराच्या दुकानाला आग; भंगाराच्या पिशव्या खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 18:09 IST

चिंचवड गावातून काळेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर केशवनगर भागात एका भंगाराच्या दुकानाला आज साडेचार वाजण्याच्या सुमारास आग लागली.

ठळक मुद्देभंगारमालाच्या पिशव्या आगीत जळून खाकमहापालिकेच्या ३ अग्निशामक गाड्यांनी आग आणली आटोक्यात

चिंचवड : चिंचवड गावातून काळेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर केशवनगर भागात एका भंगाराच्या दुकानाला आज साडेचार वाजण्याच्या सुमारास आग लागली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. महापालिकेच्या ३ अग्निशामक गाड्यांनी ही आग आटोक्यात आणली.या ठिकाणी भंगारमालाच्या पिशव्या आगीत जळून खाक झाल्या आहेत. तर अनेक मातीची भांडी जळाली आहेत. अत्यंत वर्दळीच्या असणा?्या या रस्त्यावर आगीचा प्रकार घडल्याने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. या ठिकाणी अत्यंत दाटीवाटीने अनेक दुकाने थाटण्यात आली आहेत. भंगारमालाच्या या दुकानात प्लॅस्टिक पिशव्यांचे ढीग लागले होते. या पिशव्यांनी अचानक पेट घेतल्याने आग पसरल्याची चर्चा परिसरात सुरू होती. मात्र आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. या भागात अनेक अनधिकृत व्यवसाय थाटण्यात आले आहेत. नदीपात्रालगत असणारा हा परिसर आहे. या भागात पूररेषा असल्याने बांधकामे होऊ शकत नाहीत. या मुळे येथील मोकळ्या जागेत अनेक अनधिकृत व्यवसायिकांनी दुकाने थाटली आहेत. महापालिकेचा अनागोंदी कारभार या व्यवसायांना खतपाणी घालत असल्याचा आरोप नागरीक करत आहेत. या भागात अनधिकृत व्यावसाय वाढत आहेत. अशा घटना रोखण्यासाठी पालीका प्रशासन व पोलीस यंत्रणेने लक्ष द्यावे अशी नागरिकांची मागणी आहे.

 

अनधिकृत व्यवसायाबाबत चिंता

आगीची घटना साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली. महापालिकेच्या अग्निशामक दलाने अर्ध्या तासात आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र आगीची घटना घडूनही या ठिकाणी कोणतेही पोलीस अधिकारी अथवा कर्मचारी आले नाहीत. अशा वाढत असलेल्या अनधिकृत व्यवसायाबाबत परिसरातील नागरिक चिंता व्यक्त करीत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड