शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पंक्चरच्या नावाखाली आर्थिक लूट

By admin | Updated: March 27, 2016 02:55 IST

पंक्चर काढणाऱ्यांकडून वाहनचालकांची आर्थिक लूट होत आहे. बनावट कंपन्यांच्या ट्यूब ग्राहकांच्या माथी मारल्या जात आहेत. त्या ट्यूब कमी कालावधीत खराब होत असल्याने फसवणूक

पिंपरी : पंक्चर काढणाऱ्यांकडून वाहनचालकांची आर्थिक लूट होत आहे. बनावट कंपन्यांच्या ट्यूब ग्राहकांच्या माथी मारल्या जात आहेत. त्या ट्यूब कमी कालावधीत खराब होत असल्याने फसवणूक झाल्याच्या वाहनचालकांच्या तक्रारी आहेत. शहरात १२ लाख दुचाकी व चारचाकी वाहने आहेत. रस्त्यांवर चौकाचौकांत पंक्चर काढणाऱ्यांनी टपऱ्या थाटल्या आहेत. त्यात सर्वाधिक परप्रांतीय तरुण कारागिरांचा समावेश आहे.ट्यूब असलेल्या चाकाची पहिली पंक्चर काढण्यासाठी ६० रुपये हा दर पिंपरी-चिंचवड शहर पंक्चर चालक-मालक संघटनेने ठरवून दिलेला आहे. मात्र, अनेक ठिकाणी ७० ते ८० रुपये पहिल्या पंक्चरसाठी घेतले जातात. त्या पुढच्या प्रत्येक पंक्चरला ६० रुपये घेतले जात आहेत. कामाला जाणाऱ्या किंवा विशिष्ट ठिकाणी पोहोचण्यासाठी वाहनचालक घाईत असतो. अशा वेळी पंक्चर काढणे महत्त्वाचे असते. याच गोष्टीचा फायदा घेत पंक्चर काढणारे कारागीर त्यांची आर्थिक लूट करतात. मनमानी पद्धतीने दर आकारले जात आहेत. फिटिंग करणे, वॉल रिपेअरिंग, पॅच मारणे, जादाच्या पंक्चर काढणे या सर्वांचे दर संघटनेने ठरवून दिले आहेत. मात्र सगळ्याच कामांमध्ये पंक्चर काढणाऱ्यांकडून लूट केली जात आहे. ट्यूबलेस टायरला पहिली पंक्चर काढण्यासाठी ८० रुपये दर संघटनेने निश्चित केला आहे. यासाठीही १०० रुपये आकारण्यात येतात. एकपेक्षा जास्त पंक्चर असल्यास कारागिराकडून ट्यूब बदलण्याचा आग्रह केला जातो. पॅच मारण्यासाठी फिटिंगचे वेगळे दर आकारण्यात येतात. ट्यूबच्या व्हॉल्व्हजवळ पंक्चर असल्यास तो खराब आहे, बदलावा लागेल असेही कारागीर सांगतात. त्यामुळे प्रत्येक ग्राहकाकडून एकूण बिल कसे जास्तीत जास्त वाढविता येईल, याचा पूर्ण प्रयत्न दुकानदारांकडून केला जातो. (प्रतिनिधी)शोधताना केल्या जातात अनेक पंक्चर पंक्चर शोधण्यासाठी ट्यूबमध्ये हवा भरून ते पाण्यात टाकून तपासले जाते. या वेळेत हातचलाखी करून ट्यूबला अनेक छिद्र पाडली जातात. एकाऐवजी असंख्य पंक्चर असल्याचे दिसून येते. त्यामुळे पंक्चर काढण्याचा खर्च दुप्पट ते तिपटीने वाढतो. पंक्चर काढण्याऐवजी नवीन ट्यूब बसविण्याचा आग्रह केला जातो. घाईत असल्याने वाहनचालकही नवीन ट्यूब घालण्यास नाइलाजास्तव संमती देतात. पंक्चर काढणाऱ्या कारागिरांची हातचलाखी आर्थिक कमाईचे साधन झाले आहे. मात्र, किरकाळे बाब असल्याने पोलिसांकडे तक्रार केली जात नाही.