शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरीतील अपात्र ठेकेदाराला पुण्यात काम देण्याचा घाट, महापालिका जलशुद्धीकरण प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 05:13 IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विविध मैलापाणी शुद्धीकरण केंद्रातील देखभाल-दुरुस्तीचे काम असमाधानकारक आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने चेन्नई येथील व्ही. ए. टेक वाबाग या ठेकेदार कंपनीला अपात्र ठरवून १० वर्षांसाठी बंदी घातली आहे.

हणमंत पाटीलपिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विविध मैलापाणी शुद्धीकरण केंद्रातील देखभाल-दुरुस्तीचे काम असमाधानकारक आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने चेन्नई येथील व्ही. ए. टेक वाबाग या ठेकेदार कंपनीला अपात्र ठरवून १० वर्षांसाठी बंदी घातली आहे. मात्र, याच ठेकेदार कंपनीला पुणे महापालिकेतील काही अधिकाºयांच्या संगनमताने जलशुद्धीकरण केंद्राचे काम देण्याचा घाट घालण्यात आला आहे. स्थायी समितीच्या मंगळवारी होणाºया बैठकीत यावर निर्णय होणार आहे.शहरातील मैला शुद्धीकरण केंद्राचे काम पर्यावरणदृष्ट्या महत्त्वाचे मानले जाते. महापालिकेच्या चिंचवड, भाटनगर, पिंपळे निलख व कासारवाडी मैलाशुद्धीकरण केंद्राच्या देखभाल-दुरुस्तीचे कामकाज व्ही. ए. टेक वाबाग या ठेकेदार कंपनीकडे होते. मात्र, केंद्राचे काम सुरू झाल्यानंतर या ठेकेदाराला महापालिकेने अनेकदा नोटीस व पूर्वसूचना दिली. हजारो रुपयांचा दंड आकारण्यात आला. तरीही कामकाजात सुधारणा झालीनाही. त्यामुळे आयुक्त श्रावणहर्डीकर यांच्या आदेशाने या ठेकेदाराला पिंपरी-चिंचवड महापालिकेत पुढील १० वर्षे मैलाशुद्धीकरण केंद्राबाबत कोणतीही निविदा सादर करण्याविषयी बंदी घालण्यात आली आहे.चिंचवड येथील भाटनगर मैलाशुद्धीकरण केंद्राचे काम २०१४ पासून व्ही. ए. टेक वाबाग कंपनीला देण्यात आले होते. मात्र, केंद्रात वारंवार बिघाड होत असल्याने संबंधित ठेकेदाराला दंड आकारण्यात आला होता. पिंपळे निलख व कासारवाडी (फेज २) येथील मैलाशुद्धीकरण केंद्रातही असमाधानकारक काम होते. नोटीस देऊन व दंड आकारूनही काही सुधारणा होत नसल्याने महापालिकेने कंपनीला पुढील कामांसाठी अपात्र ठरविले आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदाराने पुणे महापालिकेतील मैला शुद्धीकरण केंद्रातील पूर्वीच्या निविदांना मुदतवाढ व नवीन निविदा दाखल करण्यासाठी काही अधिकाºयांना हाताशी धरले आहे.