शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

मुलभूत सेवा स्मार्ट करण्यावर देणार भर

By admin | Updated: March 5, 2017 04:23 IST

पिंपरी चिंचवड शहराचा केंद्रशासनाच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत समावेश करणेत आलेला असून आपले शहर स्मार्ट करण्याच्या दृष्टीने स्मार्ट सिटी अभियानाअतर्गत

पिंपरी: पिंपरी चिंचवड शहराचा केंद्रशासनाच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत समावेश करणेत आलेला असून आपले शहर स्मार्ट करण्याच्या दृष्टीने स्मार्ट सिटी अभियानाअतर्गत निश्चित केलेल्या मुलभुत सेवा सुविधांचा स्मार्ट तंत्रज्ञानाचा वापर करून सुधारणा करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करावयाच्या आहेत. शहराचा स्मार्ट सिटीचा आराखडा तयार करताना शहरातील नागरिकांच्या गरजांनुसार तयार करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने नागरिकांना आपली स्मार्ट सिटी कशी असावी याबाबत शहरातील नागरिकांच्या सूचना व मते जाणून घेण्यास सुरूवात केली आहे, अशी माहिती आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली. पिंपरी-चिंचवड शहर स्मार्ट करण्याच्या दृष्टीने प्रथमत: प्रायोगिक तत्वावर शहरातील एखाद्या परिसराची निवड करावी लागणार आहे ज्या ठिकाणी ही योजना कमीत कमी कालावधीत राबविणे शक्य होईल. यासंदर्भातील आराखडा या महिनाअखेरपर्यंत केंद्र सरकारला सादर करायचा आहे. स्मार्ट सिटी पिंपरी-चिंचवड डॉट कॉम या संकेतस्थळाचे उद्घाटन आयुक्तांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सहायक आयुक्त अण्णा बोदडे, संगणक अधिकारी नीळकंठ पोमण आदी उपस्थित होते. यावेळी स्मार्ट सिटीबाबत करण्यात येणाऱ्या आराखडा आणि संकेतस्थळाचे सादरीकरण करण्यात आले. शहरातील कोणत्या क्षेत्राची निवड स्मार्ट सिटी करीता मॉडेल म्हणून करता येईल यादृष्टीने एकूण नऊ परिसरांपैकी कोणतेही तीन पसंतीचे पर्याय निवडावयाचे आहेत. त्याचप्रमाणे स्मार्ट सिटी अंतर्गत निश्चित केलेल्या मुलभुत सुविधा स्मार्ट तंत्रज्ञानाचा वापर करून सुधारणा करण्यासाठी एकूण पाच पर्याय सुलभ नागरीसेवा, सुधारीत वाहतूक व्यवस्थापन, स्मार्ट पार्कींग, सार्वजनिक वाय-फाय हॉटस्पॉट व प्रदुषण नियंत्रण इत्यादीपैकी दोन प्राधान्यक्रमाने पर्यायाची निवड करावयाची आहे. स्मार्ट सिटी करण्याच्या दृष्टीने नागरिकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे. (प्रतिनिधी)नागरिकांसाठी मोबाईल अ‍ॅपस्मार्टसिटीसंदर्भात नागरिकांच्या सूचना व मते नोदविण्यासाठी स्मार्ट सिटी पिंपरी-चिंचवड डॉट कॉम या संकेतस्थळाची निर्मिती केली आहे. त्यावर नागरिकांनी आपली मते व सूचना देण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. नागरिकांना सहजतेने आपली मते व सूचना नोदविणेकरीता पालिकेमार्फत मोबाईल अ‍ॅप तयार केले आहे.