शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

पाचवीचा विद्यार्थिही सोडवू शकतो दहावीची गणिते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 02:39 IST

कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी स्व-अभ्यास कसा करावा, विद्यार्थी स्वत: स्वत:चे शिक्षक कसे बनू शकतात, याचे सुरुवातीला उदाहरणासहित गमक सांगण्यात आले.

पिंपरी : प्रेरणा माध्यमिक विद्यालय, थेरगाव येथे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी गणित या विषयाची कार्यशाळा झाली. प्रसिद्ध गणितज्ञ रवीकुमार वरे व शिक्षणतज्ज्ञ पल्लवी कर्णिक यांनी कार्यशाळेत मार्गदर्शन केले. प्राचार्य यशवंत पवार, पर्यवेक्षक धनसिंग साबळे, शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती नाना शिवले, गणित व विज्ञान शिक्षक पांडुरंग दिवटे, अरुणा यशवंते, भीमराव शिरसाठ, अर्चना कदम उपस्थित होते.

कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी स्व-अभ्यास कसा करावा, विद्यार्थी स्वत: स्वत:चे शिक्षक कसे बनू शकतात, याचे सुरुवातीला उदाहरणासहित गमक सांगण्यात आले. दहावीची गणिते छोट्या छोट्या क्षमतांच्या स्वरूपात विभागून, तयार केलेल्या खास कृतिपत्रिका विद्यार्थ्यांना देण्यात आल्या. विद्यार्थ्यांना नेमके काय चुकले याचा अचूक शोध घेता आला. या अनोख्या पद्धतीने पाचवीचा विद्यार्थीदेखील दहावीची गणिते सोडवू शकतो, हे पाहून सर्वच जण आश्चर्यचकित झाले. धनसिंग साबळे यांनी आभार मानले.

गणित हा विषय एखाद्याला लहानपणापासूनच खूप आवडतो, पटकन जमतो तर एखाद्याला हा विषय पार रडकुंडीला आणतो. मुलांच्या मनातील गणिताची भीती घालवण्यासाठी व परीक्षेत गुण वाढावेत यासाठी काय केले पाहिजे याचे अचूक मार्गदर्शन मुलांना व्हावे यासाठी गणिताची कार्यशाळा आयोजित केली होती. - नाना शिवलेवरे यांनी विकसित केलेल्या पॅटर्ननुसार विद्यार्थ्यांनी अभ्यास केला, तर विद्यार्थी दहावीचा अभ्यासक्रम स्वत: उन्हाळ्याच्या सुटीतच पूर्ण करू शकतात, हा फार मोठा विश्वास या कार्यशाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळाला. अशा कार्यशाळेचे नियोजन अधूनमधून व्हावे अशी अपेक्षा विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड