शहरं
Join us  
Trending Stories
1
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
2
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
3
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
4
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
5
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
6
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
7
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
8
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
9
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
10
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
11
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
12
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
13
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
14
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
15
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी
16
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
17
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
18
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
19
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
20
२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा?

घाटमाथ्यावर फाजील आत्मविश्वास जीवघेणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 01:13 IST

पर्यटनस्थळांवर पर्यटकांचा फाजील आत्मविश्वास जिवावर बेतणारा ठरतो. लोणावळ्यातील भुशी धरणाच्या डोंगरातील धबधबा व लायन्स पॉइंटजवळील घुबड तलावाजवळील धबधब्यात

- विशाल विकारी

लोणावळा (पुणे) : पर्यटनस्थळांवर पर्यटकांचा फाजील आत्मविश्वास जिवावर बेतणारा ठरतो. लोणावळ्यातील भुशी धरणाच्या डोंगरातील धबधबा व लायन्स पॉइंटजवळील घुबड तलावाजवळील धबधब्यात पाय घसरून पडल्याने दोन तरुणांचा जुलै महिन्यात अंत झाला, तर आंदर मावळातील बेंदेवाडी येथील बंधाºयात पडून एका युवकाचा मृत्यू झाला.घाटमाथ्यावरील लोणावळा, खंडाळा, मावळ तालुक्यातील आंदर व पवन मावळाचा निसर्ग पर्यटकांसाठी नंदनवन आहे. येथील हिरवागार निसर्ग, धरणे, फेसाळत वाहणारे धबधबे, गड-किल्ले व लेणी पाहण्यासाठी तसेच वर्षाविहारासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येतात. लोणावळा परिसरात तरुण पर्यटकांची संख्या सर्वाधिक असते. युवक-युवती पर्यटनाचा आनंद घेताना काही वेळा फाजील आत्मविश्वासामुळे अपघातांना निमंत्रण देतात.धरणाच्या पाण्यात उतरू नका, अशी सूचना करण्यात आलेली असताना त्याकडे दुर्लक्ष केले जाते. व्हॅली परिसरात सुरक्षा रेलिंगच्या पुढे धोकादायकरीत्या कड्याच्या तोंडावर उभे राहून सेल्फी काढले जातात. डोंगरातून वाहणाºया धबधब्यांमध्ये पाण्यात उलट्या बाजूने डोंगरावर जाण्याचे धाडस करतात. त्यामुळे अपघात वाढत आहेत.वारी भैरवगडच्या डोहात१० वर्षांत १७१ बळीतेल्हारा (अकोला) :वारी भैरवगड येथे प्रसिद्ध हनुमान मंदिर असून,हे पर्यटनस्थळदेखील आहे. येथील वान नदीतील मामा-भाच्याचा डोह पर्यटकांचेआकर्षण आहे,मात्र त्याने अनेकांचा घातही केला आहे.यंदाच्या मोसमात येथे तिघांचा बुडून मृत्यू झाला. १० वर्षांत १७१ पर्यटकांचा बुडून मृत्यू झाल्याची नोंद आहे.बुलडाणा व अकोला जिल्ह्याच्या सीमेवर हे मंदिर आहे. डोहात कपारीही आहेत. पोहण्याचा मोह टाळू न शकणाºया अनेकांसाठी या कपारी मृत्यूचा सापळा बनल्या आहेत.कपारीत अडकल्याने दोन महिन्यांत कैलास ठाकरे (३३), अकबरखा बशीर खान (२४) आणि हृषीकेश विलास सांगळे (२२) यांना प्राण गमवावे लागले.