शहरं
Join us  
Trending Stories
1
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
2
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
3
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
4
शिवकुमारांनंतर काँग्रेस आमदारानेही गायले संघाचे गीत
5
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
6
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
7
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
8
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
9
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
10
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
11
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
12
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
14
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
15
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
16
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
17
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
18
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
19
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
20
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे

शहरामध्ये स्वातंत्र्यदिनाचा उत्साह

By admin | Updated: August 18, 2015 03:35 IST

पिंपरी-चिंचवड परिसरामध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त विविध कार्यक्रम झाले. खडकीमध्ये लष्करी जवानांनी सादर केलेल्या चित्तथरारक मनोऱ्याने

पिंपरी : पिंपरी-चिंचवड परिसरामध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त विविध कार्यक्रम झाले. खडकीमध्ये लष्करी जवानांनी सादर केलेल्या चित्तथरारक मनोऱ्याने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. अनेक शाळांमध्येही कवायती सादर करण्यात आल्या. ध्वजवंदनाबरोबर अनेक संस्थांनी समाजोपयोगी उपक्रम राबविले. त्यामध्ये खाऊवाटप, अनाथांना, आश्रमशाळांना मदत देण्यात आली. रक्तदान शिबिरातून मोठ्या प्रमाणात रक्त संकलित करण्यात आले. अनेक शाळांनी जवानांसाठी राख्या पाठविल्या. देशभक्तिपर गीतांनी परिसर दुमदुमून गेला होता. प्रभातफेरीत विद्यार्थ्यांनी केलेल्या क्रांतिकारकांच्या वेशभूषा उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होत्या. काही संस्थांनी यानिमित्त पर्यावरण वाचवाचा संदेश देऊन वेगळ्या उपक्रमांना सुरुवात केली. प्लॅस्टिक मुक्तीसाठी कापडी पिशव्यांचा वापर करण्याचा संदेश दिला.अखिल भारतीय मराठा महासंघअखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने माजी सैनिक साळवी यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. या वेळी दत्तात्रय यादव, एकनाथ कदम, चंद्रशेखर कणसे, संभाजी यादव, नथाजी निकम, विशाल कदम आदी उपस्थित होते. राष्ट्रतेज मित्र मंडळ, जय महाराष्ट्र मित्र मंडळ, वाघेरे टॉवर्स सोसायटी यांच्या वतीने ध्वजवंदन करण्यात आले.मासूळकर कॉलनीमधील ग्रीन फिल्ड सोसायटी, मित्तल सोसायटीमध्ये नगरसेविका मंदाकिनी ठाकरे शिक्षण मंडळाचे माजी सभापती अर्जुन ठाकरे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. एसएनबीप़ी महाविद्यालय, मोरवाडी मोरवाडी येथील एसएनबीप़ी महाविद्यालयामध्ये संस्थेचे अध्यक्ष डॉ. डी. के. भोसले यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. या वेळी ऋतुजा भोसले, संचालक सुनील शेवाळे, प्राचार्या मीना बल्ला, विधी महाविद्यालयाच्या रोहिणी जगताप, उपप्राचार्य थॉमस निक्सन आदी उपस्थित होते. तरस प्राथमिक शाळा, विकासनगरविकासनगर येथील महापालिकेच्या हभप मल्हारराव तरस प्राथमिक शाळेत नगरसेवक बाळासाहेब तरस यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. नगरसेविका सुमन नेटके, शिव स्मारक समितीचे अध्यक्ष दत्तात्रय तरस, सुधीर तरस, विशाल तरस आदी उपस्थित होते. शाळेच्या आवारात वृक्षारोपण झाले. कब बुलुबुल पथकाचा शपथविधी संपन्न झाला. स्काउट, गाईड व कब बुलबुल पथकात सतत १२ वर्षे उल्लेखनीय कामगिरी केलेल्या शिक्षिका सरस्वती भेगडे, जबीन सय्यद, रेझिया आतार, मंदा रोकडे, जयश्री आसवले तसेच पांडे यांचा जांबोरी ( जपान ) येथील शिबिरासाठी निवड झाल्याबद्दल सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. मुख्याध्यापक विठ्ठल मिरगने यांनी संयोजन केले. विभागीय करसंकलन कार्यालयकिवळे गावठाण येथील महापालिकेच्या विभागीय करसंकलन कार्यालयाच्या प्रांगणात माजी सरपंच सुदाम तरस यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. नगरसेविका संगीता भोंडवे, नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, कार्यालयप्रमुख पी. बी. देशपांडे , पोलीस पाटील दिलीप तरस, नवनाथ तरस, बाळासाहेब तरस , अशोक तरस उपस्थित होते. एंजल्स स्कूल, किवळेकोतवालनगर (किवळे) येथील एंजल्स स्कूलमध्ये सुदाम तरस यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. या वेळी स्थायी समितीचे सदस्य बाळासाहेब तरस, माजी सरपंच बापूसाहेब तरस , राजेंद्र नेटके ,दत्तात्रय तरस , नवनाथ तरस व मच्छिन्द्र तरस आदी उपस्थित होते. श्रीकृष्णनगर येथील कार्यक्रमात धर्मपाल तंतरपाळे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. मामुर्डी येथील लायन्स क्लबच्या शाळेत काशिनाथ जाधव यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. विद्यार्थ्यांना खाऊवाटप झाले, तसेच शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले.