शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचा अभ्यास दौरा

By admin | Updated: March 11, 2016 01:31 IST

हिंजवडीतील टाटा टेक्नालॉजी कंपनीने सोशल कापोर्रेट रिस्पॉन्सिबिलिटीअंतर्गत (सीएसआर) स्थानिक शेतकऱ्यांबरोबर व जोडप्रकल्पाला प्रोत्साहन देण्याचा मानस व्यक्त

वाकड : हिंजवडीतील टाटा टेक्नालॉजी कंपनीने सोशल कापोर्रेट रिस्पॉन्सिबिलिटीअंतर्गत (सीएसआर) स्थानिक शेतकऱ्यांबरोबर व जोडप्रकल्पाला प्रोत्साहन देण्याचा मानस व्यक्त केल्याने येथील १० शेतकऱ्यांच्या गटाने कंपनीचा एकदिवसीय अभ्यास दौरा करून प्रकल्पांची पाहणी केली. सीएसआरअंतर्गत देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेली शेती व शिक्षण क्षेत्रावर ते काम करीत आहेत याचाच एक भाग म्हणून माजी सरपंच श्याम हुलावळे यांच्या पुढाकाराने परिसरातील शेतकऱ्यांच्या सुमारे दोन तासांच्या या अभ्यास दौऱ्याचे नियोजन करण्यात आले होते. कंपनीतील अधिकाऱ्यांनी टाकाऊ वस्तू व कचऱ्यापासून खतनिर्मिती व सेंद्रीय शेती व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले. या वेळी कंपनीच्या सीएसआर विभागाचे मुख्याधिकारी अनुभव कपूर, अनू चौधरी, समन्वयिका मोनिका जोशी, अखिल अहिरण, योगेश भालेराव, रोहित पोरटकर यांच्यासह अभियंते सहभागी झाले होते. कंपनीचे सुविधा व्यवस्थापक कर्नल देवा कुमार व सीएसआर सल्लागार कुमार रामचंद्रन यांनी कॅन्टीनमध्ये उरलेल्या खरकट्या व टाकाऊ अन्नापासून तयार केलेला खतनिर्मिती प्रकल्प व सांडपाण्याचा विनियोग याबाबत माहिती दिली. जोशी यांनी येत्या काळात सीएसआरच्या माध्यमातून तालुक्यातील गावांत पेयजल शुद्धीकरण केंद्र, पथदिवे, शाळेला ग्रंथालय, संगणक लॅब, गावातील नागरी सुविधा व सुशोभीकरण यावर भर देणार असल्याचे सांगितले. आयटी अभियंत्यांचा दिनक्रम अगदी मिनिटावर असतो. त्यांना वेळेनुसार लाखो रुपये पगार मिळतो. मात्र केवळ या सामाजिक उपक्रमासाठी हे सर्व ४० स्वयंसेवक दररोज दोनशे तास खर्च करीत आहेत. हुलावळे यांच्यासह संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक वसंत साखरे, सूर्यकांत साखरे, मनोज साखरे, संतोष गवारे, हनुमंत साखरे, गणेश साखरे, रोहिदास केदारी, गोकुळ काकडे यांच्यासह हिंजवडी-माणमधील शेतकरी उपस्थित होते. शेतकऱ्यांना खताची बॅग आणि गुलाबाचे फुल देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. (वार्ताहर)