शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

सोयीसुविधा पुरवण्याची सूचना

By admin | Updated: April 25, 2017 04:12 IST

घोरवडेश्वर डोंगरावर भाविक व पर्यटकांसाठी आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध कराव्यात. पादचारी मार्गाची दुरवस्था दूर करावी.

देहूरोड : घोरवडेश्वर डोंगरावर भाविक व पर्यटकांसाठी आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध कराव्यात. पादचारी मार्गाची दुरवस्था दूर करावी. विविध ठिकाणी अर्धवट असलेल्या पायऱ्यांचे काम पूर्ण करावे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. सार्वजनिक स्वच्छतागृह उभारावे. परिसरातील अस्वच्छता दूर करावी, अशा विविध सूचना मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी भारतीय पुरातत्त्व विभागास केल्या आहेत. घोरवडेश्वर विकास प्रतिष्ठान व कॅन्टोन्मेन्ट सदस्य रघुवीर शेलार यांनी खासदार बारणे यांना घोरवडेश्वर डोंगरावरील विकासकामांबाबत त्यांच्या कार्यालयात भेट घेऊन साकडे घातले होते. खासदार बारणे यांनी भारतीय पुरातत्त्व विभागाचे अधीक्षकांना दिलेल्या सूचना पत्रानुसार शेलारवाडी येथील घोरावडेश्वर डोंगरावर लेणी, प्राचीन महादेव मंदिर व संत तुकाराम महाराजांचे अभ्यासाचे स्थान आहे. याठिकाणी मावळ तालुका, पुणे जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्रातील अनेक भाविक दर सोमवारसह नियमित दर्शनासाठी येत असतात. महाशिवरात्रीनिमित्त याठिकाणी मोठी यात्रा भरते. सुमारे दोन अडीच लाख भाविक यात्रेला हजेरी लावत असतात. यात्रेनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. श्रावणी सोमवार, तुकारामबीज, आषाढी व कार्तिकी वारीच्या निमित्ताने या डोंगरावर येत असतात. लेणीपर्यंत डोंगरावर जाण्यासाठी जो पादचारी मार्ग आहे, त्या मार्गावरील पायऱ्यांचे काम निम्या टप्प्यापर्यंत झाले आहे. परंतु, पुढील निम्या टप्प्याचे काम अर्धवट असल्याने अनेक भाविक घसरून पडत असल्याने गंभीर इजा व शारीरिक इजा होतात. सदर काम लवकरात लवकर पूर्ण करावे. महादेव मंदिराकडे जाणाऱ्या मार्गाच्या सुरक्षित रेलिंगचे काम झाले आहे. तशाच प्रकारचे काम तुकाराम महाराजांच्या अभ्यास गृहाकडे जाणाऱ्या रस्त्याचे करावे. सदर लेणीच्या ठिकाणी डोंगर चढून गेल्यावर भाविकांना पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था नाही. या ठिकाणी नवीन पाण्याची लाइन, पाण्याची टाकी व फिल्टर बसवून पिण्याच्या पाण्याची सोय करावी. लेणीच्या ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृह सोय नसल्याने भाविकांची व पर्यटकांची गैरसोय होत आहे, असे पत्रात म्हटले आहे. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरामध्ये अस्वच्छता निर्माण होत आहे. या ठिकाणी सार्वजनिक स्वच्छता गृहाची व्यवस्था करावी. डोंगरावरील भागात (लेणीच्या ठिकाणी) जाण्या येण्याच्या पादचारी मार्गावर पथदिव्यांची व्यवस्था अपुरी असल्याने रात्री व पहाटे लवकर जाणाऱ्या भाविकांची अडचण होत असल्याने आवश्यक ठिकाणी पथदिव्यांची व्यवस्था करावी. भाविकांना व पर्यटकांना डोंगर चढून गेल्यावर थकवा जाणवतो. त्यामुळे त्यांना बसण्यासाठी निवारा शेडची व्यवस्था लवकरात लवकर करावी आदी सूचना बारणे यांनी केल्या आहेत. घोरवडेश्वर डोंगरावरील विकासकामांबाबत कॅन्टोन्मेन्ट बोर्डाचे सदस्य रघुवीर शेलार व घोरवडेश्वर विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष भाऊसाहेब पानमंद, विश्वस्थ दत्तात्रय तरस, मधुकर बोडके, पोपट भेगडे, निर्गुण बोडके, दत्तोपंत शेलार यांनी खासदार बारणे यांच्या कार्यालयात भेट घेऊन लक्ष घालण्याची विंनती केली होती. (वार्ताहर)