शहरं
Join us  
Trending Stories
1
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
2
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा
3
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
4
ओला इलेक्ट्रीक स्कूटरवर महाराष्ट्रात गंडांतर; ३८५ शोरूम पडले बंद
5
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
6
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
7
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
8
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
9
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
10
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
11
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
12
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
13
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
14
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
15
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
16
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
17
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
18
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
19
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
20
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री

नेत्यांचा जमिनींवर डोळा

By admin | Updated: November 2, 2015 00:46 IST

पीएमआरडीएत पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण समाविष्ट करण्याचे सूतोवाच पालकमंत्री गिरीश बापट यांनी केल्याने भारतीय जनता पक्षासह शिवसेना

विश्वास मोरे,  पिंपरीपीएमआरडीएत पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण समाविष्ट करण्याचे सूतोवाच पालकमंत्री गिरीश बापट यांनी केल्याने भारतीय जनता पक्षासह शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस अशा सर्वच पक्षांनी हा शहराच्या अस्मितेचा मुद्दा केला आहे. भाजपा सरकारने विलीनीकरणाचा निर्णय मागे न घेतल्यास आंदोलनाचा इशारा सर्वच पक्षांनी दिला आहे. प्राधिकरणाची कोट्यवधींची जमीन, निधीवर भाजप नेत्यांचा डोळा असल्याचे दिसून येते. स्मार्ट सिटीतून आम्हाला घालविले, प्राधिकरणाचे विलीनीकरण होऊ देणार नाही, अशी भूमिका सर्वच पक्षांची आहे.पिंपरी-चिंचवडचा विकास होऊ लागल्यानंतर सर्वसामान्य कष्टकऱ्यांना घरकुल उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने १४ मार्च १९७२ मध्ये पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची स्थापना केली. मावळ आणि शिरूर लोकसभा या मतदारसंघातील पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या विधानसभा मतदारसंघातील दहा गावांतील सुमारे ४३२३ हेक्टर जमीन प्राधिकरणाकरिता राखीव ठेवण्यात आले. तसेच १७३९ हेक्टर क्षेत्र नियोजन आणि नियंत्रणाखाली आणण्यात आले. त्यापैकी प्रत्यक्ष ताब्यात १७७१ हेक्टर क्षेत्र आले आहे. विकसित क्षेत्र १३२५ हेक्टर आहे. उर्वरित चाळीस टक्के क्षेत्रापैकी ताब्यात न आलेले क्षेत्र अधिक आहे. तसेच उर्वरित क्षेत्रावर मूळ शेतकऱ्यांनी प्राधिकरणाने जमिनी ताब्यात घेण्यापूर्वी विक्री केली आहे. प्राधिकरण स्थापन झाल्यापासून ४६ पैकी अनेक पेठा अजूनही विकसित झालेल्या नाहीत. प्राधिकरण स्थापनेनंतरही संपादन कार्यवाही सुरू आहे. या संस्थेला योग्य नेतृत्व न मिळाल्याने क्षमता असतानाही विकास झाला नाही. मोशी, इंद्रायणीनगर, चिखली, प्राधिकरण, रावेत या भागातील जमीन अद्यापही विकसित झालेली नाही.