शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यामध्ये जलजन्य आजारांचा वाढला उद्रेक

By admin | Updated: January 5, 2017 03:04 IST

गॅस्ट्रो, अतिसार, टायफॉईड (विषमज्वर) आणि कॉलरा (पटकी) या जलजन्य म्हणजेच पाण्यापासून पसरणाऱ्या आजारांच्या प्रमाणात वाढ झाली असून, मागील वर्षात राज्यभरात

पुणे : गॅस्ट्रो, अतिसार, टायफॉईड (विषमज्वर) आणि कॉलरा (पटकी) या जलजन्य म्हणजेच पाण्यापासून पसरणाऱ्या आजारांच्या प्रमाणात वाढ झाली असून, मागील वर्षात राज्यभरात या आजारामुळे ३० जणांचा बळी गेला आहे. जानेवारी २०१६ ते डिसेंबर २०१६ या एका वर्षात राज्याच्या विविध भागांत एकूण ११६ जणांना लागण झाली होती. त्यातील काही रुग्णांना गंभीर लागण झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. यापैकी सर्वाधिक उद्रेक हा ठाणे विभागात झाला असून, ८ जणांचा पाण्यामार्फत होणाऱ्या आजारांनी मृत्यू झाला आहे. कोणत्याही आजाराचा उद्रेक म्हणजे एखाद्या विशिष्ट प्रदेशात एखाद्या आजाराचे सर्वसाधारण संख्येपेक्षा अधिक रुग्ण सापडणे. जलजन्य आजारांमध्ये गॅस्ट्रो, अतिसार, टायफाईड आणि कॉलरा यांचा समावेश होतो. राज्यभरात लागण झालेल्या ११६ रुग्णांमध्ये सर्वाधिक उद्रेक अतिसाराचा असून, या रुग्णांची संख्या ५२, गॅस्ट्रो ४४, काविळ ११ आणि कॉलरा ८ इतकी नोंदवण्यात आली आहे. हे सर्व उद्रेक दूषित पाण्यामुळे झाले असून, त्या ठिकाणी आरोग्य विभागाने योग्य त्या उपाययोजना केल्या आहेत. जलजन्य आजार हे साठलेल्या पावसाच्या पाण्याने किंवा पिण्याचे पाणी दूषित झाल्याने होतात. ग्रामीण भागात जास्त पाऊस झाल्यामुळे पाणी साचून राहते त्यानंतर त्यामध्ये घाण, कचरा गेल्याने ते दूषित बनते, ग्रामीण भागात तेच पाणी पिण्यासाठी वापरल्याने नागरिकांना बाधा होऊ शकते. तर शहरी भागात पिण्याच्या पाण्यासाठी असणारी पाईपलाईन जुनी झाल्यास किंवा गंजल्यास त्याद्वारे दूषित पाणी पिण्याच्या पाण्यात मिसळते आणि आजारांची लागण होते. याबरोबरच नदी, नाले यांमध्ये अस्वच्छ आणि सांडपाणी सोडल्यामुळेही आजारांचा उद्रेक होण्यास कारणीभूत ठरते.ठाणे विभागात जलजन्य आजारांचे सर्वाधिक म्हणजे ३२ उद्रेक झाले असून, त्यातील ८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर नागपूर विभागात १९ उद्रेक व सात मृत्यू, नाशिक विभागात २० उद्रेक आणि पाच मृत्यू, अकोला विभागात १३ उद्रेक आणि ५ मृत्यू तर पुणे विभागात ३ उद्रेक आणि दोन मृत्यू झाले आहेत. पुणे विभागातील सोलापूरमध्ये दोन जणांचा मृत्यू हा गॅस्ट्रोने झाल्याची माहिती साथरोग विभागाचे राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी दिली. सन २०१५मध्ये याच आजारांची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ११८ होती तर केवळ सात जणांचा जलजन्य आजारांनी मृत्यू झाला होता.