शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

बाहेरच्यांना प्रवेश, स्वकीयांची मनधरणी

By admin | Updated: September 22, 2015 03:10 IST

शहर काँग्रेसने ‘काँग्रेस आपल्या दारी’ उपक्रम घेतला. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत या उपक्रमाचे उद्घाटन झाले. आगामी महापालिका निवडणुकीची नांदी समजल्या जाणाऱ्या काँग्रेसच्या

संजय माने, पिंपरीशहर काँग्रेसने ‘काँग्रेस आपल्या दारी’ उपक्रम घेतला. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत या उपक्रमाचे उद्घाटन झाले. आगामी महापालिका निवडणुकीची नांदी समजल्या जाणाऱ्या काँग्रेसच्या या कार्यक्रमात अन्य पक्षांतून काहींनी जाहीर प्रवेश केला. अन्य पक्षांतून अनेक जण काँग्रेसमध्ये प्रवेश करताहेत, ही स्वागतार्ह बाब आहे; परंतु एकीकडे त्यांचे स्वागत करत असताना, दुसरीकडे स्वकीयांची मनधरणी करण्याची वेळ आली आहे.काँग्रेस पक्षाची २०१२च्या महापालिका निवडणुुकीत पीछेहाट झाली. तब्बल २९ जागा काँग्रेसला लढविता आल्या नाहीत. २०१७च्या निवडणुकीत काँग्रेसवर अशी नामुष्की ओढवू नये, म्हणून आतापासूनच जोरदार तयारी सुरू केली आहे. मात्र, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत नुकताच कार्यक्रम झाला. प्रदेशाध्यक्षांच्या कार्यक्रमाला माजी शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांच्यासह एक गट अनुपस्थित राहिला. शिवाय काही पदाधिकारी, नगरसेवक गैरहजर राहण्याचे धाडस दाखविले याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. पक्षांतर्गत गटबाजीमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांची गळचेपी होत होती. गटबाजी दूर व्हावी, नव्या नेतृत्वाला संधी मिळावी, यासाठी पक्षश्रेष्ठींनी सचिन साठे यांच्याकडे अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. बदल केल्यानंतरही पदाधिकारी, काही नगरसेवक यांची हेकेखोर वृत्ती जैसे थे आहे. पक्षापेक्षा, पक्षश्रेष्ठींपेक्षा आपण कोणी तरी मोठे आहोत, अशी त्यांची भावना झाली. त्यातून गटबाजीचे प्रदर्शन घडू लागले आहे. अन्य पक्षांतून येणाऱ्यांचे सन्मानाने स्वागत केले जात असताना, पक्षातील कोणी बाहेर जाणार नाही या दृष्टीने अधिक प्रयत्न होणे गरजेचे आहेत.