शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

पूर्वलक्ष्यी प्रभावाने शास्तीकर माफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 07:07 IST

अनधिकृत बांधकामे नियमितीकरणात अडथळा ठरणारे थकीत शास्तीकराबाबत राज्य शासनाने आज धोरणात्मक निर्णय घेतला आहे

पिंपरी : अनधिकृत बांधकामे नियमितीकरणात अडथळा ठरणारे थकीत शास्तीकराबाबत राज्य शासनाने आज धोरणात्मक निर्णय घेतला आहे. निवासी बांधकामांची शास्ती पूर्वलक्ष्यी प्रभावाने माफ झाली असल्याचे भाजपाचे शहराध्यक्षआणि आमदार लक्ष्मण जगतापयांनी पत्रकार परिषदेत सांगितले.राज्य शासनाच्या निर्णयाचा फायदा एक हजार स्क्वेअर फुटापर्यंतच्या अनधिकृत बांधकामांना होणारआहे. सुमारे तीन लाख मिळकतींना फायदा होणार असल्याचा दावा भाजपाने केला आहे.पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरातील अनधिकृत बांधकामांबाबत एक याचिका उच्च न्यायालयात दाखल झाल्यामुळे शहरातील अनधिकृत बांधकामांचा प्रश्न राज्यभर गाजला होता. महापालिकेने शहरात ६६ हजार बांधकामे अनधिकृत आहेत, असे प्रतिज्ञापत्र २००८ मध्ये न्यायालयात सादर केले होते. दरम्यान १ आॅगस्ट २००८ नंतरच्या बांधकामांना दुप्पट शास्ती लावण्यात यावी, असा निर्णय काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेस आघाडी सरकारने घेतला होता. त्यामुळे महापालिकेने शहरातील बांधकामांना शास्ती लावली होती. आज अखेर शास्तीकराची सुमारे ४७६.३६ कोटी थकबाकी आहे. अनधिकृत बांधकामे नियमितीकरणाचे धोरण राज्य शासनाने स्वीकारले असले तरी अनधिकृत बांधकाम नियमित करताना शास्ती भरण्याची अट होती. त्यामुळे शास्तीकर हा पूर्वलक्ष्यी प्रभावाने संपूर्ण शास्तीकर माफ करावा, अशी मागणी सर्व राजकीय पक्षांकडून होत होती. यावरून विरोधी पक्षांनी भाजपाच्या नेत्यांना लक्ष्य केले होते. महापालिका निवडणुकीपूर्वीसहाशे स्क्वेअर फुटापर्यंतच्या बांधकामांना पूर्ण शास्ती माफ झाली होती. त्यानंतर महापालिकेने नवीन आदेशानुसार कार्यवाहीही सुरू केली होती. त्यानंतर राज्य शासनाने आज निर्णय घेतला आहे.याबाबत आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले, ‘‘शास्तीकराबाबत यापूर्वी निर्णय झाला होता. मात्र, पूर्वलक्ष्यी प्रभावाने कर माफ नसल्याने अनधिकृत बांधकामे नियमितीकरणासाठी अर्ज केले नव्हते. त्यामुळे राज्यसरकारने पूर्वलक्ष्यी प्रभावाने कर माफ केला आहे. शहरातील बांधकामांचे सर्वेक्षण सुरू केले आहे. त्यातून २०१५ पूर्वीची बांधकामे नोंदविल्यानंतर सुमारे तीन लाख मिळकतींना शास्तीकरातून सुटका होणार आहे.’’शास्तीवरून भाजपा लक्ष्यतसेच शास्तीकरावरून भाजपाच्या आमदारांना लक्ष केले होते. अनधिकृत बांधकामे आणि शास्तीसाठी पक्ष सोडला. आता भाजपानेही प्रश्न सोडविला नाही. त्यामुळे कोणत्या पक्षात जाणार अशी टीका राष्टÑवादी काँग्रेसने भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्यावर केली होती. त्यानंतर दोनच दिवसात याबाबत शासनाने निर्णय घेतला आहे. शास्तीवरून भाजपा लक्ष्य झाली होती.महापालिकेच्या करसंकलन विभागाच्या नोंदणीनुसार शहरात एकूण ४ लाख ८६ हजार ७१५ मिळकती आहेत. त्यापैकी अनधिकृत मिळकतींची संख्या ७९ हजार १८९ मिळकती आहेत. २०१५ पूर्वीच्या बांधकामे नियमितीकरणाचे धोरण सरकारने स्वीकारले आहे. त्यामुळेनोंद न केलेल्या मिळकतधारकांनाही नोंद करता येणार आहे. तसेच याबाबत महापालिकेच्या वतीने तातडीने सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यात नवीन मिळकती अधिक प्रमाणावर मिळू शकतील, असेही जगताप म्हणाले.शासन निर्णयात गुंतागुंतराज्य शासनाच्या संकेतस्थळावर शास्ती संदर्भातील निर्णयाचा उल्लेख आहे. त्यात अनधिकृत बांधकामांवरील शास्ती पूर्वलक्ष्यी प्रभागाने सुधारणेचा महत्त्वपूर्ण निर्णय असे म्हटले आहे. मात्र, खालील मजकुरात शास्तीचे तीन स्लॅब केले आहेत. महापालिका निवडणुकीपूर्वीही अशाच प्रकारचा आदेश शासनाने काढलेला होता. त्यात आणि आताच्या निर्णयात काहीसे साम्य आहे. संकेतस्थळावरील अल्प माहितीवरून शासन निर्णयातील अचूकता पुढे आलेले नाही. निर्णयात गुंतागुंत अधिक आहे.सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले, ‘‘अनधिकृत बांधकाम शास्तीबाबत सरकारने दिलेले आश्वासन पूर्ण केले आहे. पूर्वलक्ष्यी प्रभावाने शास्ती माफ हे धोरण सरकारने स्वीकारले आहे. निर्णय आज झाला. त्यामुळे शहराच्या वतीने मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन. शास्तीकराच्या निर्णयाबाबत सरकारने षटकारमारला आहे.’’