शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

इंद्रायणीनगरमध्ये अखेर होणार मंडई

By admin | Updated: December 12, 2015 00:33 IST

इंद्रायणीनगर मंडईचे काम अनेक वर्षांपासून प्रलंबित होते व भूमिपूजन होऊनही कामाला प्रत्यक्षात मुहूर्त लागत नव्हता. निविदाला प्रतिसाद मिळत नसल्याने कामाला ठेकेदार मिळत नव्हता

भोसरी : इंद्रायणीनगर मंडईचे काम अनेक वर्षांपासून प्रलंबित होते व भूमिपूजन होऊनही कामाला प्रत्यक्षात मुहूर्त लागत नव्हता. निविदाला प्रतिसाद मिळत नसल्याने कामाला ठेकेदार मिळत नव्हता. मात्र, एकदाचा मंडईच्या कामाला प्राधिकरणाला ठेकेदार मिळाला असून, येत्या १५ दिवसांत प्रत्यक्षात कामाला सुरुवात होईल. इंद्रायणीनगरचा सर्व भाग पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या अंतर्गत येतो. त्यामुळे येथील सर्व कामे प्राधिकरणाकडून करून घ्यावी लागतात. गेल्या अनेक वर्षांपासून या भागात मंडई व्हावी, यासाठी नागरिकांची मागणी होती. माजी आमदार विलास लांडे यांनी यासाठी पुढाकार घेऊन मंडईचा मार्ग मार्गी लावला होता. इंद्रायणीनगरमध्ये भाजी मंडईच नसल्याने भाजी व फळविक्रेते रस्त्यावर व्यवसाय करत होते. भाजी व फळविक्रेते यांनी रस्त्यावर केलेल्या अतिक्रमणामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. तसेच येथील नगरसेवक व नागरिकांची मागणीही वाढत होती. त्यामुळे प्राधिकरणाने येथील पेठ क्रमांक दोनमध्ये दोन हजार तीनशे चौरस मीटर जागेत ७२ भाजी विक्रेते व १३ फळविक्रेत्यांसाठी गाळ्यांचे नियोजन करून कामास मंजुरी देण्यात आली होती. यासाठी प्राधिकरणाने दोन कोटी तेरा लाख छपन्न हजार रुपयांची अंदाजपत्रकात तरतूदही केली होती. दीड वर्षापूर्वी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार, महापौर मोहिनी लांडे, विभागीय आयुक्त विकास देशमुख, प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश म्हसे, नगरसेवक संजय वाबळे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. मात्र, अजूनही कामाचा पत्ताच नाही. काम होणार नव्हते, तर भूमिपूजन कशाला केले, अशा तिखट प्रतिक्रिया नागरिकांमधून येत होत्या. या कामासाठी ठेकेदार मिळत नसल्याची चर्चा वारंवार होत होती. निविदा प्रक्रिया राबवूनही ठेकेदार मिळत नव्हता. या कामासाठी एकदाचा ठेकेदार मिळाला असून, संकल्प कन्स्ट्रक्शन यांना हे काम मिळाले आहे. २ कोटी २ लाख ८८ हजार एवढी रक्कम खर्चून प्राधिकरण बझार इंद्रायणीनगरमध्ये होण्याचा मार्ग आता मोकळा झाला असून, येत्या १५ दिवसांत काम सुरू होणार असल्याची माहिती प्राधिकरणाकडून देण्यात आली आहे. (वार्ताहर)