शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

पर्यावरणरक्षण, कलासंवर्धनाचा दिला संदेश; महापालिका आयुक्तांनी केली अनोखी सजावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 01:09 IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी बाप्पांना आकर्षक सजावट केली आहे.

पिंपरी : गणेशोत्सवात घरगुती गणपतीस आकर्षक सजावट केली जाते. पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी बाप्पांना आकर्षक सजावट केली आहे. कला आणि विद्येची देवता असलेल्या बाप्पांसमोर विविध कला साहित्य संस्कृतीचे दर्शन घडविणारी आकर्षक सजावट केली आहे. अभिजात शास्त्रीय संगीतातील संवादिनी अर्थात हार्मोनियम, तबला, तंबोरा आणि विविध पुस्तकांचा वापर केला आहे. परंपरा जपण्याबरोबरच पर्यावरण, कला संवर्धनाचा संदेश दिला आहे.कला अधिपती गणरायाचे आगमन झाले आहे. शहर गणेशमय झाले आहे. नेत्रदीपक सजावटी आणि रोषणाई लक्ष वेधून घेत आहेत. शहरातील विविध मान्यवरांनीही बाप्पाची प्रतिष्ठापना करताना आगळेवेगळे संदेश दिले आहेत. महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर हे मोरवाडी-केएसबी चौक रस्त्यावरील बंगल्यात वास्तव्यास आहेत. त्यांनीही गणेशाची प्रतिष्ठापना केली आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर आणि आदिती हर्डीकर हे दाम्पत्य कलाप्रेमी आहे. जेथे नियुक्तीवर असतील त्या ठिकाणी आयुक्त हे गणरायाची प्रतिष्ठापना करतात. पाच दिवस मनाभावे सेवा केली जाते. तसेच दरवर्षी बाप्पांसमोर वेगवेगळी आकर्षक अशी आरास केली जाते. यंदा गणपतीसमोर पर्यावरणपूरक कलासंस्कृतीचे दर्शन घडविणारी सजावट केली आहे.आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले,‘‘गणपती ही कलेची देवता आहे. त्यामुळे कलांची आरास तयार केली आहे. दरवर्षी आमच्या घरी गणपती बसविला जातो. यंदा पर्यावरणपूरक आरास तयार केली आहे. सर्वसाधारणपणे गणपतीच्या आरास करण्यासाठी थर्माकोल वापरले जाते. मात्र, आरास करण्यासाठी १९९२ पासून थर्माकोलचा वापर बंद केला आहे. तर, १९९१ पासून गणपतीचे विसर्जन करण्याचे बंद केले आहे. देव्हाऱ्यातीलच मूर्ती प्रतिष्ठापित केली जाते. घरामध्येच पाण्यात विसर्जित केले जाते आणि पुन्हा ती मूर्ती देव्हाºयात ठेवली जाते. गणपतीनिमित्त दरवर्षी वेगवेगळी थिम घेऊन आरास केली जाते. यंदा कलांचा अधिपती ही संकल्पना घेतली आहे. नागरिकांनीही पर्यावरणपूरक असा उत्सव साजरा करण्यावर भर द्यायला हवा.’’कलाधिपती बाप्पांना भेटगणराय हे कलांचे अधिपती. त्यामुळे आयुक्तांनी कलांचा अधिपती ही संकल्पना घेतली आहे. सजावटीत विविध कला आणि त्यांच्या संबंधितील साहित्य मांडले आहे. भारतीय अभिजात संगीताची वाद्ये, लेखन साहित्य, पॉटरी, पेंटिंग, फोटोग्राफी, ग्लासवर्क, घुंगरू, सावंतवाडीतील लाकडी खेळणी, पुस्तके, कवितासंग्रह, कागद असे बरेच कला साहित्य ठेवण्यात आले आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMuncipal Corporationनगर पालिकाcommissionerआयुक्त