शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

संकेतस्थळावर माहिती द्या

By admin | Updated: March 21, 2017 05:10 IST

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या विविध विभागांतील कामांसाठी नेमलेल्या ठेकेदारांचे करार तसेच बोर्डाच्या हद्दीत सुरु असणाऱ्या

देहूरोड : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या विविध विभागांतील कामांसाठी नेमलेल्या ठेकेदारांचे करार तसेच बोर्डाच्या हद्दीत सुरु असणाऱ्या सर्व विकासकामांचे, कामांचे तसेच विविध वार्षिक ठेक्यांचे आदेश सामान्य जनतेच्या माहितीसाठी तसेच पारदर्शक कारभारासाठी सूचनाफलकावर व संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याची मागणी परिसरातील नागरिकांतून होत आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील सातही वॉर्डांतील नागरिक विविध करांच्या रूपाने मोठ्या प्रमाणात निधी जमा करीत आहेत. दरमहा अगर दोन महिन्यांनी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत लाखो रुपयांच्या कामांना मंजुरी दिली जाते. मात्र कामे कधी सुरु होतात व कधी पूर्ण होतात, याचा थांगपत्ता लागत नाही, अशी नागरिकांची ओरड आहे. बोर्डाकडून विविध विभागांच्या मार्फत विविध विकासकामे, दुरुस्ती व देखभाल, देण्यात आलेले विविध ठेके त्यांची माहिती, ठेकेदारांना देण्यात आलेले कामांचे आदेश, त्यांच्याशी करण्यात आलेले करार, कामाची रक्कम, कामाची मुदत, संबंधितांची जबाबदारी आदी बाबींची सविस्तर माहिती नागरिकांना समजत नाही. त्यामुळे कामाचे आदेश प्रसिद्ध केल्यास कोणत्या वॉर्डात काय काम सुरु झाले आहे, याची सविस्तर माहिती मिळाल्यास त्यावर दर्जेदार काम होण्यासाठी अंकुश ठेवणे जागरूक नागरिकांना शक्य होऊ शकते. तसेच मोठ्या रकमेच्या कामांच्या ठिकाणी कामाबाबतची संपूर्ण माहिती असलेला फलक लावणे बंधनकारक करावे, असे मत नागरिकांनी व्यक्त केले. (वार्ताहर)