शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

इंग्रजी शाळांकडून आरटीईला हरताळ

By admin | Updated: January 24, 2017 02:09 IST

शिक्षण हक्क कायद्यांतील (आरटीई) तरतुदीनुसार प्रवेशापूर्वी विद्यार्थ्यांची परीक्षा घेणे बेकायदेशीर आहे. मात्र, शहरातील

पिंपरी : शिक्षण हक्क कायद्यांतील (आरटीई) तरतुदीनुसार प्रवेशापूर्वी विद्यार्थ्यांची परीक्षा घेणे बेकायदेशीर आहे. मात्र, शहरातील अनेक पूर्व प्राथमिक शाळांकडून विद्यार्थी व पालकांची परीक्षा घेऊन आरटीई कायद्याला हरताळ फासला जातो. तसेच कोणतीही कल्पना न देता शाळा अचानक बंद केल्या जातात. त्यामुळे यावर नियंत्रण आणण्यासाठी केंद्रीय बालहक्क व संरक्षण आयोगाच्या नियमावलीची अंमलबजावणी करण्याची गरज आहे. परंतु, शिक्षण विभागाकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे.इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडील पालकांचा वाढता ओढा लक्षात घेऊन संस्थाचालकांनी पूर्वप्राथमिक शाळांच्या माध्यमातून शिक्षणाचा बाजार मांडला आहे. त्यामुळे शहरातील गल्लीबोळात पूर्वप्राथमिक शाळा सुरू झाल्याचे दिसून येते. दहा हजार रुपयांपासून दोन ते अडीच लाख रुपयांपर्यंत वार्षिक शुल्क शाळांकडून वसूल केले जाते. मराठी माध्यमांच्या सर्वच शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत नाही, असा गैरसमज पालकांनी करून घेतल्यामुळे इंग्रजी माध्यमाच्या शाळा चालविणाऱ्या संस्थाचालकांकडून त्याचा गैरफायदा घेतला जात आहे. आरटीई कायद्यातील तरतुदीनुसार पूर्वप्राथमिक वर्गाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची परीक्षा घेता येत नाही. परंतु, सिहंगड रस्त्यावरील नामांकित शाळांसह लष्कर भागातील काही शाळांनी विद्यार्थी व पालकांच्या परीक्षा घेतल्या आहेत.शिक्षण विभागाकडून इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे दुर्लक्ष केले जाते. फर्ग्युसन रस्त्यावरील ट्री हाऊस ही शाळा अचानक बंद केल्याने विद्यार्थी व पालकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागले. तसेच गेल्या काही वर्षांपासून पूर्वप्राथमिक शाळांवर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाने स्वतंत्र कायदा करण्याची गरज असल्याची मागणी विविध क्षेत्रातून केली जात आहे. माजी शिक्षण राज्यमंत्री फौजिया खान यांच्या अध्यक्षतेखाली पूर्वप्राथमिक शाळांवर नियंत्रणाची नियमावली करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली होती. परंतु, या समितीच्या अहवालावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे राज्याच्या शिक्षण विभागाने केंद्रीय बालहक्क संरक्षण आयोगाच्या मार्गदर्शक नियमावली स्वीकारण्याची गरज आहे, अशी मागणी आम आदमी पार्टीतर्फे केली जात आहे. शासनाकडे निधी नसल्याने पूर्वप्राथमिक शाळांबाबत कायदा करता येत नसल्याचे राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडून सांगितले जाते. मात्र, केंद्रीय बालहक्क संरक्षण आयोगाच्या नियमावलीच्या अंमलबजावणीसाठी निधीची गरज भासणार नाही. तसेच सर्व शाळा शासनाच्या नियंत्रणाखाली येतील. शाळांकडून शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदीकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे पूर्वप्राथमिक शाळांची जबाबदारी महिला व बालकल्याण विभागाकडे देतायेऊ शकते. (प्रतिनिधी)