शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वाकडमध्ये प्राधिकरणाची अतिक्रमण कारवाई

By admin | Updated: May 10, 2017 04:11 IST

येथील नवनगर विकास प्राधिकरणाच्या जागेत उभारलेल्या एका शाळेसह कस्पटे वस्ती टेलिफोन एक्सेंजशेजारील नंदीवाल्यांच्या

लोकमत न्यूज नेटवर्कवाकड : येथील नवनगर विकास प्राधिकरणाच्या जागेत उभारलेल्या एका शाळेसह कस्पटे वस्ती टेलिफोन एक्सेंजशेजारील नंदीवाल्यांच्या १०० झोपड्यांवर प्राधिकरणाच्या अतिक्रमण विभागाने मंगळवारी कारवाई करीत अतिक्रमण हटविले. कारवाईच्या सुरुवातीला थोडा विरोधवगळता कारवाई सुरळीत पार पडली. तत्पूर्वी शालेय साहित्याचे नुकसान होऊ नये म्हणून सर्व साहित्य बाहेर काढण्यासाठी शाळा प्रशासनाला वेळ देण्यात आली. दुपारी १२ला प्राधिकरणाने सर्वे क्रमांक २०८ मधील नंदीवाल्यांच्या पालांकडे मोर्चा वळविला. मुलांच्या शाळांची आबाळ अन् तरुणांच्या कामाची अडचण सांगून या रहिवाशांनी प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप खलाटे यांची भेट घेऊन एक वर्ष मुदतवाढ घेतली होती. मुदत संपूनही या झोपड्या न हटविल्याने थेट कारवाई करण्यात आली. अखेर रहिवाशांनी अधिकाऱ्यांकडे संसारोपयोगी वस्तू बाहेर काढण्याची मुभा मागितल्याने उन्हाच्या कहरात पाल मोडून सामान बांधाबांधीची धांदल उडाली. झोपड्यांवर बुलडोजर फिरणार असल्याने सर्वजण हवालदिल झाले होते. लहानगे भांबावून गेल्याने त्यांची रडारड सुरु होती. उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश अहिरराव यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच उपअभियंता तथा क्षेत्रीय अधीक्षक वसंत नाईक यांच्या नेतृत्वाखाली शाखा अभियंता के. जी. तळीखेडे, माहिती अधिकारी वर्षा पवार यांनी कारवाई पार पाडली.