शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

महिला सुरक्षा योजना सक्षम करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 03:12 IST

महापालिकेच्या महिला व बाल कल्याण समितीने शहरातील महाविद्यालयाच्या परिसरात होणाºया टवाळखोरीविषयी चर्चा करण्यासाठी पोलीस आयुक्तांसमवेत बैठक घेतली होती.

पिंपरी : महापालिकेच्या महिला व बाल कल्याण समितीने शहरातील महाविद्यालयाच्या परिसरात होणाºया टवाळखोरीविषयी चर्चा करण्यासाठी पोलीस आयुक्तांसमवेत बैठक घेतली होती. त्यात महिलांच्या सुरक्षतेसाठी पोलीस यंत्रणेद्वारे विकसीत केलेल्या बडी कॉप, पोलीस काका या सुविधांसह एस. एम. एस़ व मोबाईल अ‍ॅप, महिला सुरक्षा समिती या योजना सक्षमरित्या विकसीत कराव्यात, अशा सूचना केल्या. पोलिसांनी महिला सुरक्षेचे अभिवचन दिले.शहरातील महाविद्यालयांच्या परिसरात होणाºया टवाळखोरीबाबत ‘लोकमत’ने पाहणी केली होती. याची दखल घेत समितीच्या सभापती सुनीता तापकीर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीस परिमंडळ तीनचे उपायुक्त गणेश शिंदे, स्थायी समिती सभापती सीमा सावळे, नगरसदस्य सागर अंगोळकर, नगरसदस्या डॉ. वैशाली घोडेकर, योगिता नागरगोजे, सुनीता तापकीर, सोनाली गव्हाणे, चंदा लोखंडे, सुलक्षणा धर, निकिता कदम, रेखा दर्शले, आशा धायगुडे-शेंडगे, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, नगरसचिव उल्हास जगताप, सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, समाजविकास अधिकारी संभाजी ऐवले, सहायक समाजविकास अधिकारी सुहास बहादरपुरे, प्राचार्य शशिकांत पाटील आदी उपस्थित होते. पोलीस यंत्रणेद्वारे महिलांचे संरक्षण सक्षमरीत्या करण्यासाठी तापकीर यांनी पोलीस उपयुक्तांना महिलांचे प्रतिनिधी म्हणून राखी बांधली.सुनीता तापकीर म्हणाल्या, ‘‘बडी कॉप, पोलीस काका या योजनेची जनजागृती महापालिका व पोलीस यंत्रणे मार्फत पोस्टर, सिटी केबल, वर्तमान पत्रे, प्रसार माध्यमांद्वारे मोठ्या प्रमाणात करण्यात यावी. पोलिसांमार्फतलेडी पोलीस मार्शल शाळा, महाविद्यलये, कार्यालये आदी ठिकाणी नेमण्यात यावे.’’स्थायी समिती सभापती सीमा सावळे म्हणाल्या, ‘‘लोकमतने काही दिवसांपूर्वी महाविद्यालयातील टवाळखोरीबाबत आवाज उठविला होता. महापालिका परिसरातील महाविद्यालयांची पाहणी केली होती. ही बाब गंभीर आहे. ही बाब ओळखून पहिल्यांदाच महिला बाल कल्याण समितीमध्ये चर्चा झाली.माजी महापौर डॉ. वैशाली घोडेकर यांनी पूर्वी अस्तिवात असलेली विशाखा समिती पुन्हा कार्यान्वित करण्यात यावी, अशी मागणी केली. पोलीस उपयुक्त गणेश शिंदे म्हणाले, ‘‘बैठकीत चांगली चर्चा झाली. नागरी सुरक्षिततेबाबत पोलीस दक्ष असतात. महिलांनी सुरक्षिततेबाबत मांडलेल्या महिलांच्या तक्रारींबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.’’