शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

अग्निशामक दलातील कर्मचारी असुरक्षित

By admin | Updated: December 10, 2015 01:14 IST

जवडीतील स्वर्गीय राजीव माहिती-तंत्रज्ञाननगरीतून कोट्यवधी रुपयांचा महसूल शासनास मिळतो. मात्र, येथील अग्निशामक दलाकडे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे दुर्लक्ष होत आहे

पिंपरी : हिंंजवडीतील स्वर्गीय राजीव माहिती-तंत्रज्ञाननगरीतून कोट्यवधी रुपयांचा महसूल शासनास मिळतो. मात्र, येथील अग्निशामक दलाकडे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे दुर्लक्ष होत आहे. विमाकवच नसल्याने दुसऱ्यांचा जीव वाचविणारे अग्निशामक दलाचे कर्मचारी असुरक्षित आहेत. चोवीस तास पिळवून घेतले जात आहे. महामंडळ दाद देईना आणि सरकार निर्णय घेईना, अशी स्थिती कर्मचाऱ्यांची झाली आहे. त्यांनी दाद मागायची कोणाकडे, असा प्रश्न आहे.हिंजवडी- माण-मारुंजीत टप्पा एक, दोन आणि तीनमध्ये आयटी पार्क विकसित झाला आहे. सुमारे दीड हजार छोट्या-मोठ्या कंपन्या आणि सुमारे सव्वादोन लाख कामगार, संगणक अभियंते या परिसरात काम करतात. फेज एक आणि फेज तीनमध्ये अग्निशामक दलाचे कार्यालय आहे. या दोन्ही ठिकाणी असणाऱ्या पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. मात्र, मुनष्यबळ अपुरे आहे. निम्म्याहून कमी असा कर्मचारीवर्ग येथे आहे. याबाबत कामगारांनी रयत कामगार संघटनेच्या वतीने महामंडळ, एमआयडीसीकडे आणि कामगार मंत्र्यांकडे दाद मागितली. मात्र, त्यांना अद्याप न्याय मिळालेला नाही. आग विझविणे, गॅस गळती होणे, बांधकाम पडले, अपघात झाला. त्या वेळी मदतीसाठी या केंद्रातील कर्मचारी जात असतात. आयटी पार्क परिसरात वर्षभरात शंभर एक घटना घडतात. या घटनांमध्ये कमीत कमी वित्तहानी किंवा मनुष्यहानी व्हावी, या दृष्टीने प्रयत्न करण्यासाठी दलाचे कर्मचारी झटत असतात. अग्निशामक दलाचे कार्यालय आहे, म्हणून लाखो कामगार निश्चिंत असतात. मात्र, कर्मचाऱ्यांची संख्या अत्यल्प असल्याने आयटी पार्कमधील लाखो कामगारांचे जीवन धोक्यात घालण्याचे काम महामंडळ करीत आहे.आयटी पार्कमधील केंद्रात अग्निशमनच्या गाड्या, आग विझविण्यासाठी प्राथमिक स्वरूपाची यंत्रणा येथे उपलब्ध आहे. मात्र, मोठ्या प्रमाणावर लागलेली आग विझविण्यासाठी फायर सूट नाहीत. आयटी इंडस्ट्री असल्याने या ठिकाणी अत्याधुनिक यंत्रणा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे. आयटी पार्कच्या सुरक्षिततेसाठी सध्या या केंद्राकडे ३५ मीटर आणि ५५ मीटर उंचची शिडी उपलब्ध आहे. साधारणपणे अठरा मजल्यांपर्यंत पोहोचता येते. या परिसरात आता २२ मजल्यांपर्यंत इमारती निर्माण झाल्या आहेत. त्यामध्ये कोणत्याही प्रकारची दुर्घटना झाल्यास ती आटोक्यात आणण्यासाठी सध्या उपलब्ध असलेली शिडी कमी पडत आहे. महाराष्ट्र शासन, महामंडळ, तसेच इतर अग्निशामक संस्थांच्या नियमाप्रमाणे दैनंदिन काम हे सर्वांसाठी समान आठ तासांचे असले पाहिजे, असा नियम आहे. मात्र, नियम काही कर्मचाऱ्यांसाठी खंडित स्वरूपाचा असेल, असा महामंडळाचा कोणताही नियम नाही. मात्र, कर्मचारी उपलब्ध नसल्याने आठ तासांपेक्षा अधिक काळ राबवून घेतले जात आहे. (प्रतिनिधी)