शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय सीमाशुल्क विभागाचा एल्गार

By admin | Updated: January 31, 2017 04:13 IST

जीएसटी कायद्याची अंमलबजावणी राज्य स्तरावर केली जाणार आहे. केंद्राने जीएसटी कायदा लागू करून एकच कर आकारण्याची प्रणाली अवलंबली आहे. यापूर्वी केंद्रीय

पिंपरी : जीएसटी कायद्याची अंमलबजावणी राज्य स्तरावर केली जाणार आहे. केंद्राने जीएसटी कायदा लागू करून एकच कर आकारण्याची प्रणाली अवलंबली आहे. यापूर्वी केंद्रीय पातळीवर हे कामकाज केले जात असल्याने त्यात एकसूत्री कारभार होता. विविध राज्यांच्या स्तरावर जीएसटी कायद्याची अंमलबजावणी वेगवेगळी होणार असल्याने एकसूत्रीपणाला बाधा येणार आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी देशपातळीवर केंद्रीय सीमाशुल्क, अबकारी कर, सेवा कर विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून निषेध नोंदवला. पिंपरी-चिंचवड येथील आकुर्डीतील कार्यालयातील कर्मचा-यांनीही सोमवारी निषेध आंदोलन झाले. भारतीय महसूल प्रशासनातील सीमा शुल्क, अबकारी कर, सेवा कर या विभागात काम करणारे सुमारे ७० हजार केंद्रीय कर्मचारी आहेत. जीएसटी कौन्सिलबाबत कोणाचीही तक्रार नाही. मात्र जीएसटी करवसुली अंमलबजावणी करताना यापुढे केंद्रीय महसूल प्रशासनाऐवजी त्या त्या राज्यांना त्यांच्या पातळीवर अधिकार असतील. केंद्रीय कमचाऱ्यांना करवसुलीचा वर्षानुवर्षांचा अनुभव आहे. मात्र, त्यांच्याकडील ९० टक्के काम काढून घेतले जाणार आहे. त्यांच्याकडे केवळ १० टक्केच काम राहील. देशपातळीवर केंद्रीय कर्मचाऱ्यांकडून या मुद्द्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आकुर्डीतील केंद्रीय सीमा शुल्क,अबकारी कर, सेवा कर आयुक्तालयाच्या आवारात पर्यवेक्षक, निरीक्षक, तसेच अन्य कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून एकत्रित येऊन निषेध नोंदवला. (प्रतिनिधी)