शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणतर्फे मागेल त्याला वीजजोड

By admin | Updated: December 10, 2015 01:11 IST

पिंपरी-चिंचवड शहरात मागेल त्याला वीजजोडणी देण्यात येणार आहे. गुरुवारी (दि. १०) दोन्ही शहरांत १४ ठिकाणी ही मोहीम राबविली जाणार आहे.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात मागेल त्याला वीजजोडणी देण्यात येणार आहे. गुरुवारी (दि. १०) दोन्ही शहरांत १४ ठिकाणी ही मोहीम राबविली जाणार आहे. याशिवाय वीजयंत्रणेची व नागरिकांच्या तक्रारीनुसार वीजदेयकांची दुरुस्तीची कामेही या वेळी केली जाणार आहेत.पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील महावितरणच्या ९ विभागांतर्गत या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यासाठी १४ ठिकाणांची निवड करण्यात आली आहे. त्यानंतर प्रत्येक गुरुवारी अन्य ठिकाणांची निवड करून हा एकदिवसीय त्रिसूत्री कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. त्या अंतर्गत पुणे शहरातील रामटेकडी परिसर, गाडीतळ (बंडगार्डन), येरवडा परिसर (नगर रोड), शिवणे परिसर (कोथरूड), भिलारेवाडी-कात्रज, गंज पेठ, भवानी पेठ (पद्मावती), इंदिरानगर, पानमळा व परिसर, शंकर मंदिर जनता वसाहत परिसर (पर्वर्ती), खडकी (शिवाजीनगर), मंगळवार पेठमधील मेलवाणी कंपाउंड परिसर (रास्ता पेठ) आणि पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपरीगाव परिसर (पिंपरी) व महात्मा फुलेनगर (भोसरी विभाग) या ठिकाणी हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली.या उपक्रमांतर्गत वीजयंत्रणेच्या दुरुस्ती अभियानात वीजखांब, लघु व उच्च दाबाच्या वीजतारांची दुरुस्ती, सर्र्व्हीस वायर बदलणे, स्पेसर्स बसविणे, झाडाच्या फांद्या तोडणे आदी कामे होतील. वीजदेयकांच्या दुरुस्ती अभियानात वीजग्राहकांच्या तक्रारीनुसार देयके जागेवरच दुरुस्त करणे, वीजमीटरचे रीडिंग होत नसल्यास ते घेणे, सदोष व नादुरुस्त मीटर बदलून देणे, वीजदेयके मिळत नसल्यास ते उपलब्ध करून देणे आदी कामे तर महावितरण आपल्या दारी या उपक्रमात मागेल त्यांना नवीन वीजजोडणी देणे, अशी विविध प्रकारचे कामे करण्यात येणार असून, वीजग्राहकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)