शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक खर्चात दुप्पट वाढ

By admin | Updated: February 1, 2017 04:43 IST

महापालिका निवडणुकसाठी एका इच्छूक उमेदवाराला खर्च करण्यासाठी ४ लाखांच्या मर्यादेमध्ये दुप्पटीने वाढ करून ती ८ लाख इतकी करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाकडून

पिंपरी : महापालिका निवडणुकसाठी एका इच्छूक उमेदवाराला खर्च करण्यासाठी ४ लाखांच्या मर्यादेमध्ये दुप्पटीने वाढ करून ती ८ लाख इतकी करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाकडून मंगळवारी काढण्यात आले आहेत. त्यामुळे अवघ्या ४ लाखात निवडणुकीचा हिशोब कसा दाखवायचा याच्या चिंतेत असलेल्या इच्छूक उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांनी पैशांचा मोठयाप्रमाणात वापर करून निवडणुकीवर प्रभाव पाडू नये यासाठी निवडणूक आयोगाकडून उमेदवारांनी निवडणुकीमध्ये करावयाच्या खर्चावर मर्यादा घातली जाते. राज्यातील आगामी दहा महापालिकांच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या, त्यावेळी उमेदवारांना खर्च करण्यासाठी ४ लाख रूपये निश्चित करण्यात आली होती. मात्र वाढत्या महागाईच्या पार्श्वभुमीवर इतक्या खर्चात निवडणुक लढविणे अवघड असल्याने त्यामध्ये दुप्पटीने वाढ करून ती ८ लाख इतकी करण्याचा निर्णय निवडणुक आयोगाकडून घेण्यात आला आहे.राज्य निवडणुक आयोगाकडून १५० ते १६१ सदस्यसंख्या असलेल्या महापालिकांच्या उमेदवारांसाठी १० लाख इतकी खर्चाची मर्यादा निश्चित केली आहे. ११६ ते १५० सदस्यसंख्या असलेल्या महापालिकांसाठी ८ लाखांपर्यंत, ८६ ते ११५ सदस्यसंख्येच्या महापालिकांसाठी ७ लाख, ६५ ते ८५ सदस्यसंख्या असलेल्या पालिकांसाठी ५ लाख इतकी उमेदवारांसाठी खर्चाची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. त्याचबरोबर जिल्हा परिषदांसाठी ४ लाख ते ६ लाख तर पंचायत समित्यांसाठी ३ ते ४ लाख इतकी उमेदवारांसाठी खर्चाची मर्यादा निश्चित केली आहे. (प्रतिनिधी)उमेदवारी अर्जानंतर खर्चाचा होणार हिशेब उमेदवाराने निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यानंतर मतदान होईपर्यंत त्याच्याकडून निवडणुकीसाठी केला जाणारा खर्च मोजला जातो. निवडणुकीसाठी दररोज केल्या जाणाऱ्या खर्चाची माहिती त्यांना निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांकडे जमा करावी लागते. उमेदवारांना घालून दिलेल्या मर्यादेपेक्षा त्यांना जास्तीचा खर्च करता येत नाही, तसे आढळून आल्यास त्यांच्यावर निवडणुक आयोगाकडून कारवाई केली जाते.