शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक लाच घेताना अडकले जाळ्यात

By admin | Updated: March 21, 2017 19:15 IST

लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी

 ऑनलाइन लोकमत
पिंपरी, दि. 21 - लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी अलका कांबळे व क्रीडा प्रबेधिनीचे मुख्याध्यापक बाबासाहेब राठोड यांना मंगळवारी लाचेची रक्कम  घेताना रंगेहाथ पकडले. लाच घेताना पकडण्यात आलेल्यांमध्ये माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी अलका कांबळे तसेच मुख्याध्यापक बाबासाहेब अंबादास राठोड या दोघांचा समावेश आहे. त्यांच्याविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 
पिंपरीतील उद्यमनगर येथे महापालिकेची क्रीडा प्रबोधिनी शाळा आहे. विद्यार्थी खेळाडू घडविण्याच्या उद्देशाने ही क्रीडा प्रबोधिनी सुरू करण्यात आली आहे. खेळाडूंसाठी वेळोवेळी क्रीडा शिबिरे आयोजित केली जातात. या क्रीडा शिबीरातील खेळाडूंना अल्पोपहार पुरविण्याचे काम दिलेल्या कॅन्टीन ठेकेदारास बील मंजूरीसाठी लाचेची मागणी केली. अनुकुल अहवाल आणि बील मंजुरीसाठी १४ मार्च २०१७ ला त्यांनी २५ हजार रुपये लाच रकमेची मागणी केली. अशी तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे करण्यात आली होती. त्यातील ५ हजार रूपये मुख्याध्यापकासाठी, उर्वरित २० हजार रूपये शिक्षणाधिकाऱ्यांसाठी मागण्यात आले होते. ठरल्यानुसार पैसे घेऊन आलेल्या व्यकतीकडून मंगळवारी क्रीडाप्रबोधिनी शाळेजवळ त्यांनी लाचेची रक्कम स्वीकारली. मुख्याध्यापक राठोड यांना रक्कम स्विकारताना रंगेहात पकडले. शिक्षणाधिकारी कांबळे यांना द्यावयाची रक्कमही राठोड यांनीच स्विकारली. त्यावेळी त्यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले. मुख्याध्यापक बाबासाहेब अंबादास राठोड (३४,रा.रहाटणी), शिक्षणाधिकारी अलका ज्ञानेश्वर कांबळे (५४,रा.एचए कॉलनी) यांना पिंपरी पोलिसांनी ताब्यात घेतले.  
लाचलुचपत प्रतिबंधक पुणे युनिटचे पोलीस निरीक्षक राजू चव्हाण, चंद्रकांत चौधरी, पोलीस हवालदार सुनील शेळके, पोलीस शिपाई किरण चिमटे, कारले, महिला पोलीस निरिक्षक गायकवाड यांच्या पथकाने  ही कारवाई केली.