शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

भूमिपूजनाचा लावला धडाका

By admin | Updated: April 9, 2016 01:44 IST

महापालिका निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी सत्ताधारी राष्ट्रवादी काँगे्रसने सध्या शहरात भूमिपूजन कार्यक्रमांचा धडाका लावला आहे.

पिंपरी : महापालिका निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी सत्ताधारी राष्ट्रवादी काँगे्रसने सध्या शहरात भूमिपूजन कार्यक्रमांचा धडाका लावला आहे. यासाठी नेतेमंडळीही आठवड्यातून दोन-दोन वेळा शहरात दाखल होत आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी काँगे्रसची एकहाती सत्ता आहे, तर सध्या राज्यात आणि केंद्रात भाजपा सत्तेत आहे. अशातच पुन्हा महापालिकेत सत्तेत येण्यासाठी राष्ट्रवादीची तयारी सुरू आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून प्रस्तावित असलेल्या विविध प्रकल्पांच्या भूमिपूजनाचा सपाटा लावला आहे. पक्षांच्या नेत्यांमार्फत भूमिपूजन केले जात असून, या कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे. शनिवारी, २ एप्रिलला शहरात आलेले माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विविध प्रकल्पांचे उद्घाटन व भूमिपूजन करण्यात आले. भूमकर चौक ते शिवाजी चौक या रस्त्याचे भूमिपूजन, भक्ती-शक्ती चौक ते मुकाई चौक या रस्त्यावरील निसर्गदर्शन सोसायटीजवळील रेल्वे लाइनवर उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाचे भूमिपूजन, दळवीनगर येथील शाळा इमारतीचे भूमिपूजन, नाशिकफाटा उड्डाणपूल येथे पादचाऱ्यांसाठीच्या पुलाचे भूमिपूजन, बोपखेल फाटा ते आळंदी रस्ता विकसित करण्याच्या कामाचा प्रारंभ यांचा समावेश आहे. यानिमित्त पवार दिवसभर शहरातच होते. त्या वेळी त्यांनी प्रभाग अधिकाऱ्यांची नावे निश्चित केली होती. तसेच ७ एप्रिलला गुरुवारीदेखील अजित पवार यांनी शहरात हजेरी लावली. भोसरीतील संत ज्ञानेश्वर भाजी मंडई व व्यापारी संकुल इमारतीचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले. अशाप्रकारे पवार सहा दिवसांत दोनवेळा शहरात आले. एरवी शहरात येण्यासाठी वेळ नसणारे नेते आता शहराला पुरेपूर वेळ देत आहेत. पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेत आहेत.(प्रतिनिधी)