शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

प्राधिकरणाच्या जागेत होतेय ‘डम्पिंग’

By admin | Updated: May 23, 2017 05:05 IST

भोसरी एमआयडीसी, तसेच इंद्रायणीनगर परिसरात प्राधिकरणाच्या मालकीच्या भूखंडावर दगड-माती, जुन्या इमारतींचे अवशेष अशा अनावश्यक बाबी

लोकमत न्यूज नेटवर्कभोसरी : भोसरी एमआयडीसी, तसेच इंद्रायणीनगर परिसरात प्राधिकरणाच्या मालकीच्या भूखंडावर दगड-माती, जुन्या इमारतींचे अवशेष अशा अनावश्यक बाबी टाकण्याचा प्रकार राजरोसपणे सुरू आहे. त्यामुळे या जागांची ‘डंपिंग ग्राउंड’कडे वाटचाल सुरू झाली आहे. वेळीच या प्रकारांना आवर न घातल्यास प्राधिकरणाच्या जागा पूर्णत: राडारोड्यात हरवून बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.प्राधिकरणाच्या मालकीचे अनेक भूखंड एमआयडीसी स्पाईन रस्ता परिसर, सेक्टर ३, ४ व ५ येथे आहेत. यापैकी इंद्रायणीनगरजवळच्या भूखंडावर मुलांसाठी क्रिकेट व वाहन चालविण्याचे धडे या ठिकाणी घेतले जात होते. कित्येक जागांना संरक्षक भिंत नसल्याने अशा जागांवर अतिक्रमण होण्याचा धोका असल्याचे दिसून येते. खंडेवस्ती भागात अशा प्रकारे अतिक्रमण करून ब-याचशा झोपड्या बांधल्या आहेत. या झोपड्यांमध्ये दारूविक्रीसारखे अवैध व्यवसाय चालत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. पण त्याकडे पोलीस व प्राधिकरण लक्ष देत नाही.प्राधिकरणाच्या मैदानाला संरक्षक भिंत नसल्याने ठिकठिकाणी अनेक गुन्हेगारी कृत्ये झाली आहेत. स्पाईन रस्त्यालगत प्राधिकरणाच्या हद्दीतील मुरुमचोरीच्या घटना अजूनही सुरू असल्याचे दिसून येत आहे. तसेच या जागेचा वापर खासगी कंटेनर पार्किंग करण्यासाठी होऊ लागला आहे.