शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

बजाज ऑटो एम्प्लॉईज सोसायटीवर नियमबाह्य कारभार केल्याचा ठपका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 01:13 IST

तत्कालीन संचालक, पदाधिकारी दोषी : जिल्हा उपनिबंधकांकडून चौकशी अहवाल सादर

पिंपरी : बजाज आॅटो एम्प्लॉईज को-आॅप. क्रे. सोसायटी आकुर्डी, पुणे या संस्थेच्या तत्कालीन संचालक व पदाधिकाऱ्यांनी नियमबाह्य व अनियमित कारभार केल्याचा ठपका पुणे सहकारी संस्थेचे विशेष लेखापरीक्षक वर्ग-२ यांनी केलेल्या चौकशीत ठेवण्यात आला आहे.

बजाज आॅटो एम्प्लॉईज को-आॅप. सोसायटीवर यापूर्वी असलेल्या तत्कालीन संचालक मंडळाच्या नियमबाह्य कारभारामुळे संस्थेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, अशी तक्रार संस्थेचे सभासद ईश्वर ठोंबरे, बाबूराव पाटील, बाळासाहेब ठाणगे यांनी उपनिबंधक सहकारी संस्था व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्याकडे केली होती. तसेच तत्कालीन संचालकांनी केलेल्या या नियमबाह्य व अनियमित कारभाराबद्दल चौकशी करण्यासह तातडीने लेखापरीक्षण करण्यासाठीही अर्ज केला होता. त्यानुसार सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक लावंड यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी सहकारी संस्थेचे (पणन) विशेष लेखापरीक्षक वर्ग-२ राजेंद्र कांबळे यांची नियुक्ती केली होती. दरम्यान, राजेंद्र कांबळे यांनी तत्कालीन संचालक, पदाधिकारी यांनी सादर केलेल्या खुलाशासह संपूर्ण प्रकरणांची चौकशी पूर्ण करून अभिप्रायाच्या अनुषंगाने कारवाई करण्याबाबतचा अहवाल सादर केला आहे.संचालक मंडळाकडून कसलाही अपहार अथवा गैरकारभार झालेला नाही. तक्रारीतील तथाकथित मुद्दे हे तांत्रिक आहेत. याबाबत आम्हाला आमची बाजू मांडण्यास कमी वेळ देण्यात आला. अशातच सर्व बाजू तपासून न घेता एकतर्फी चौकशी अहवाल दिला आहे. तसेच हा अहवाल अद्यापपर्यंत आमच्यापर्यंत पोहोचलेलाच नाही. यावरून तक्रारदार आणि संबंधित अधिकारी यांच्यात साटेलोटे असल्याचे दिसते. काही विघ्नसंतोषी व्यक्तींकडून जाणीवपूर्वक हा प्रकार केला आहे. याबाबत आम्ही उच्च न्यायालयात बाजू मांडणार आहे. - बाळू थोरवे, तत्कालीन सचिव, बजाज आॅटो एम्प्लॉईज सोसायटी

चौकशी अहवालात घेण्यात आलेले आक्षेपतत्कालीन संचालकांनी संस्थेसाठी घेतलेली सेक्टर क्रमांक २१ येथील प्लॉट नं. ३९३ व ३९४ ही जागा व इमारत पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची निवासी क्षेत्रातील असल्याने व्यावसायिक वापरासाठी प्राधिकरणाने हस्तांतरण करण्यास नकार दिला.शकुंतला गोडबोले व विरेंद्र गोडबोले यांच्याबरोबर जागेचा व इमारतीचा खरेदीबाबतचा स्वतंत्र करारनामा बनवून तत्कालीन पदाधिकारी व अध्यक्ष छगन ढवळे, सचिव बाळू थोरवे यांनी वैयक्तिक नावाने मिळकत हस्तांतरणाची नियमबाह्य कृती केली.यासह तत्कालीन संचालक मंडळाने अनधिकृत शेड उभारल्याने ते पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या क्षेत्रीय अधिकारी झोन २ यांनी महाराष्ट्र राज्य प्रादेशिक नगररचना अधिनियमान्वये दिलेल्या नोटीसनुसार काढून टाकावे लागले. संस्थेचे आर्थिक नुकसान झाले. यास तत्कालीन संचालक जबाबदार असून, ते नुकसानीची रक्कम वसूल करण्यास पात्र आहेत.२००९ पासून नवीन सभासद होताना प्रत्येक सभासदाकडून पाचशे तेसात हजारांपर्यंत वेगवेगळा इमारत निधी संस्थेच्या तत्कालीन संचालक मंडळाने घेऊन संस्थेचे मंजूर पोटनियम व संस्थेने केलेले इमारत निधीबाबतचे व्यवहार नियमांचे उल्लंघन करणारे असल्याचा ठपका ठेवला आहे.या सर्व बाबी पाहता संस्थेच्या आर्थिक नुकसानीस तत्कालीन संचालक, पदाधिकारी जबाबदार असून, आर्थिक नुकसानीची रक्कम व्याजासह वसूल करण्यास पात्र असल्याचेही जिल्हा उपनिबंधक यांनी अहवालात म्हटले आहे.