शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता अर्धवट बुजविल्याने धोका, वाहनचालकांची कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 03:54 IST

वाल्हेकरवाडी ते रावेत या मार्गावर महावितरण कंपनीतर्फे बिजलीनगर ते किवळे दरम्यान टाकण्यात येणाऱ्या केबलसाठी मोठी चर खोदल्याने रस्ता अरुंद झाला आहे. ठेकेदाराने केबल टाकल्यानंतर रस्ता व्यवस्थित न बुजविल्यामुळे येथे खड्डे झाले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना वाहन चालविताना कसरत करावी लागत आहे.

रावेत - वाल्हेकरवाडी ते रावेत या मार्गावर महावितरण कंपनीतर्फे बिजलीनगर ते किवळे दरम्यान टाकण्यात येणाऱ्या केबलसाठी मोठी चर खोदल्याने रस्ता अरुंद झाला आहे. ठेकेदाराने केबल टाकल्यानंतर रस्ता व्यवस्थित न बुजविल्यामुळे येथे खड्डे झाले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना वाहन चालविताना कसरत करावी लागत आहे.रस्त्याच्या दुसºया बाजूला उघड्या अवस्थेतील नैसर्गिक नाला आहे. अर्धवट अवस्थेत बुजविण्यात आलेली चर आणि नाल्यामुळे रस्ता केवळ आठ ते दहा फूट राहिल्याने वाहने चालविताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. रात्रीच्या वेळी नवीन वाहनचालकांना नाला लवकर लक्षात येत नाही. त्यामुळे नाल्यात वाहने जाऊन अपघात होत आहेत. दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजनेंतर्गत बिजलीनगर येथील मुख्य विद्युत केंद्रातून किवळे येथे राबविण्यात येत असलेल्या योजनेसाठी वाल्हेकरवाडी येथील संत नामदेव चौक ते रावेत दरम्यान मोठी चर रस्त्याच्या कडेला खोदली होती. काम पूर्ण झाल्यानंतर ही चर व्यवस्थित बुजविणे अपेक्षित असताना ती अर्धवट अवस्थेत बुजवली आहे. त्याचा राडारोडा रस्त्यावर पडल्याने दुचाकी वाहनचालक घसरून पडून किरकोळ स्वरूपाचे अपघात झाले आहेत. मुळातच हा रस्ता अरुंद असून, येथून वाहनांची वाहतूक वर्दळ असते. या मार्गाचा वापर अनेक वाहने द्रुतगती मार्ग, रावेत, डांगे चौक आदी ठिकाणी जा-ये करण्यासाठी करीत असतात. ठेकेदाराने तत्काळ रस्ता पूर्ववत करावा, अशी मागणी वाहनचालक करीत आहेत.वाल्हेकरवाडी-रावेत मार्गावरील हा रस्ता अत्यंत धोकादायक असून रात्रीच्या वेळी अनेकदा या मार्गावरील पथदिवे बंद असतात. त्यातच रस्ता अरुंद आणि धोकादायक वळण असल्याने वाहनचालकांना पुढील वाहनांचा अंदाज येत नाही. त्यामुळे येथे अनेकवेळा अपघात घडले आहेत. काही वाहने नाल्यात कोसळली आहेत. त्यामध्ये काहींना प्राण गमवावा लागला आहे. त्यामुळे मुळातच अरुंद असणारा रस्ता या कामामुळे अधिक अरुंद झाल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे.महापालिकेच्या विकासकामाला विरोध नाही. परंतु तो सुनियोजित आणि योग्य पद्धतीने असावा. काही महिन्यांपूर्वी डागडुजी करून तयार करण्यात आलेला रस्ता आणि पदपथ लागलीच उखडल्याने नागरिकांना त्रास होत आहे. रस्ता आणि पदपथ पूर्ववत करण्यासाठी नागरिकांच्या कररूपी पैशांचा वापर न करता महापालिकेने महावितरण कंपनीच्या ठेकेदाराकडून रस्ता आणि पदपथ पूर्ववत करावा- श्रीधर वाल्हेकर,माजी सभापती, शिक्षण मंडळढिसाळ कारभारकाही महिन्यांपूर्वी निगडी ते डांगे चौक दरम्यान टाकण्यात येणाºया जलवाहिनीकरिता रस्ता उखडण्यात आला होता. या कामाच्या पूर्णत्वास काही महिने उलटले होते. त्यानंतर खोदलेला रस्ता व त्याकरिता काढण्यात आलेले पेव्हिंग ब्लॉक नव्याने बसविण्यात आले. काही दिवसांतच रस्ता आणि पेव्हिंग ब्लॉग पुन्हा उखडून टाकले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडnewsबातम्या