शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वाहनतळ नसल्याने रस्त्यावरच वाहने

By admin | Updated: December 8, 2015 00:03 IST

स्वर्गीय राजीव गांधी माहिती-तंत्रज्ञाननगरी हिंजवडी येथे वाहनतळाची सुविधा उपलब्ध नसल्याने चालकांना वाहने रस्त्यावरच उभी करावी लागत आहेत.

पिंपरी : स्वर्गीय राजीव गांधी माहिती-तंत्रज्ञाननगरी हिंजवडी येथे वाहनतळाची सुविधा उपलब्ध नसल्याने चालकांना वाहने रस्त्यावरच उभी करावी लागत आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. शिवाजी चौक हिंजवडी ते मारुंजी, शिवाजी चौक ते संत तुकाराम गार्डन, शिवाजी चौक ते फेज एक या रस्त्यावर दुतर्फा वाहने व प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाही उभ्या असल्याने येथील कोंडी फुटणार कधी? हिंजवडीतील कोंडीकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. माहिती-तंत्रज्ञाननगरीची उभारणी करताना, भविष्याचा वेध घेऊन पायाभूत सुविधा सक्षम करण्याकडे महाराष्ट्र औद्योगिक महामंडळ अर्थात एमआयडीसीने लक्ष न दिल्याने त्याचे परिणाम आज उद्योजक, कामगार आणि या परिसरातून ये-जा करणाऱ्या नागरिकांवर होत आहे. वेळ आणि पैसा या दोन्हींचा अपव्यय होत आहे. याकडे येथील सत्ताधारी, राजकारणी गांभीर्याने लक्ष देत नाहीत, ही दुर्दैवाची बाब आहे.वाहतूक पोलिसांची कारवाईच नाहीकेवळ मुख्य चौकातील वाहतूक नियंत्रण करण्याशिवाय ठोस उपाययोजना वाहतूक पोलिसांनी केलेल्या नाहीत. त्यामुळे दिवसेंदिवस वाहतूककोंडीत भरच पडत आहे. शिवाजी चौकात वाकडकडे जाणाऱ्या रस्त्यावर अनेक दुकानदारांनी पदपथावरच दुकाने थाटली आहेत, तर प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा रस्त्यावरच उभ्या केल्या जात असल्याने सकाळी साडेनऊ ते दुपारी साडेबारा आणि सायंकाळी साडेपाच ते रात्री साडेआठ या वेळेत रिक्षांमुळे वाहतूककोंडीत भर पडत आहे. अशीच अवस्था शिवाजी चौक ते फेज एक या रस्त्यावर आहे. चौकापासून सुमारे तीनशे मीटरपर्यंत आणि याच चौकातून मारुंजी रस्त्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर अशाच प्रकारे मोठ्या प्रमाणावर वाहने रस्त्यावरच उभी असतात. फळवाले, हातगाडीवाले उभे राहत असल्याने पादचाऱ्यांना चालणेही कठीण होते. वाहनतळाचे नियोजन नाहीचमाहिती-तंत्रज्ञाननगरीत प्रवेश केल्यानंतर फेज एक रस्ता, फेज दोन रस्ता आणि फेज तीन रस्ता या तिन्ही रस्त्यांवर, तसेच अंतर्गत रस्त्यांवर वाहनतळाची सोय नसल्याने रस्त्यावरच वाहने उभी केली जातात. कंपन्यांच्या आवारात वाहनांसाठी सोय केलेली आहे. मात्र, वाहनांच्या संख्येच्या तुलनेत ही सोय पुरेशी नाही. कामगारांव्यतिरिक्त येणाऱ्या वाहनांनाही रस्त्यावर वाहने उभी राहण्यासाठी सोय केलेली नाही. शिवाजी चौकापासून इन्फोसिस चौकापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा वाहने दिसून आली. (प्रतिनिधी)