शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

चिखलामुळे घसरुन होताहेत अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 02:42 IST

एका वाहतूक व्यावसायिकाच्या वाहनामुळे किवळे ते विकासनगर रस्त्यावर चिखलाचा थर निर्माण झाला आहे. चिखलाच्या थरावरून

लोकमत न्यूज नेटवर्ककिवळे : एका वाहतूक व्यावसायिकाच्या वाहनामुळे किवळे ते विकासनगर रस्त्यावर चिखलाचा थर निर्माण झाला आहे. चिखलाच्या थरावरून दुचाकी व हलक्या मोटारी घसरून अपघात होत आहेत. दहा-पंधरा दिवस उलटल्यानंतरही महापालिकेच्या वतीने रस्त्यावरील चिखल काढण्यासाठी कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थ व वाहनचालकांनी या रस्त्यावरील चिखलाचा थर काढून गैरसोय दूर करावी व अपघात टाळावेत, अशी मागणी केली आहे.किवळे हद्दीत एका वाहतूक व्यावसायिकाने शेतात सपाटीकरण करून त्या ठिकाणी संबंधित माल वाहतूक करणारी जड व अवजड वाहने उभी केली जात आहेत. मालवाहू वाहने उभी राहण्याच्या ठिकाणी असणारा चिखल संबंधित वाहनांच्या ये-जा करण्याने वाहनतळावरील चिखल मुख्य वर्दळीच्या विकासनगर-किवळे या रस्त्यावर येत आहे. या वाहनांच्या टायरला लागून (चिकटून) माती-चिखल वाहनासोबत दूरपर्यंत जात असून, त्यामुळे विकासनगर व रावेतकडे जाणाऱ्या रस्त्याच्या काही भागात, तसेच काही वाहने देहूरोड - कात्रज महामार्गावर जात असल्याने लांबपर्यंत रस्त्यावर चिखल पसरत आहे. या दोन्ही रस्त्यांवर दुचाकी व चारचाकी वाहनांची वर्दळ असते. हा रस्ता चिखलाने व्यापला आहे. प्रवाशांचा जीव मुठीतदेहूरोडसह, विकासनगर, एमबी कॅम्प, गहुंजे, सांगवडे, साळुंब्रे, दारूंब्रे आदी भागातील शेतकरी, तळवडे आयटी पार्कमधील अभियंते, परिसरातील कामगार व विद्यार्थ्यांना आपली दुचाकी घेऊन दररोज या रस्त्यावरील चिखलातून जीव मुठीत धरून जावे लागत आहे. महापलिकेच्या संबंधित विभागाने रस्त्यावरील चिखलाचा थर काढून टाकण्याबाबत गेल्या पंधरवड्यात काहीही कार्यवाही केली नसल्याने स्थानिक ग्रामस्थ व वाहनचालक त्रस्त झाले आहेत. महापालिका जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.