शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

वाहनचालकांच्या बेशिस्तपणामुळे वाकड भूमकर चौक दोन तास जाम

By admin | Updated: October 22, 2016 00:04 IST

रात्री नऊ नंतर बेशिस्त वाहनचालक लेन कटिंग करून आडवी-तीडवी वाहने अचानक सामोरा-समोर आल्याने वाकड भूमकर चौक रात्री सुमारे दोन तास जाम झाल्याने

ऑनलाइन लोकमत
पिंपरी-चिंचवड, दि. 21 - रात्री नऊ नंतर बेशिस्त वाहनचालक लेन कटिंग करून आडवी-तीडवी वाहने अचानक सामोरा-समोर आल्याने वाकड भूमकर चौक रात्री सुमारे दोन तास जाम झाल्याने दमून भागून घराकडे जाणाऱ्या आयटी अभियंत्यांसह कामगार वर्गाची व स्थानिकांची मोठी अबदा झाली. वाहतूक पोलिसांच्या मदतीने वाहतूक पुन्हा पूर्ववत करण्यात आली. 
     येथील भूमकर चौकातील भुयारी मार्गावरून राष्ट्रीय महामार्ग गेला आहे तर खालून विविध मार्ग गेले  आहेत त्यामुळे हा चौक एरवी वर्दळीने भरलेला असतो रात्री साडे आठ पर्यंत येथे वाहतूक पोलीस कार्यरत असतात मात्र शुक्रवारी रात्री नऊ नंतर एकाच वेळी आलेल्या अनेक वाहनचालकांनी चौकात कोणीच नसल्याचा फायदा घेत वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून वाहने आडवी तीडवी घातली त्यामुळे अनेक वाहने एकाच वेळी समोरासमोर अडकल्याने वाहतुकीचा खेळ खंडोबा झाला डांगे चौक हिंजवडी रस्त्यावर भूमकर वस्ती ते काळाखडक जाधव कॉर्नर पर्यंत तर इकडे माय कार शोरूम पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. 
        अचानक झालेल्या या वाहतूक कोंडीत सर्वचजण अडकून पडले मात्र वाहतूक कोंडी कशामुळे झाली आहे कोणाला समजेना जिकडे-तिकडे गोंधळ सुरु झाला त्यात काही मिनिटांपूर्वी वाहतूक पोलीस घरी गेल्याने वाहतुकीचे नियमन करायला कोणीच नसल्याने आणखी बट्ट्याबोळ झाला अखेर वैतागलेल्या काहींनी याबाबत नियंत्रण कक्षाला माहिती देताच वाहतूक अधिकाऱ्यांनी घरी केलेल्या चार ते पाच वाहतूक कर्मचाऱ्यांना माघारी बोलावीत त्यांची मदत घेतली अन पावणे अकरा वाजता वाहतूक पूर्ववत झाली. याबाबत वाहतूक विभागाचे वरिष्ठ निरीक्षक म्हणाले शिवाजी चौक आणि भूमकर चौक येथे उद्यापासून एक कर्मचारी आणि वार्डनची रात्री उशिरा पर्यंत नेमणूक करण्यात येईल.