शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरीत आवक घटल्याने फळभाज्या महाग

By admin | Updated: July 4, 2017 03:49 IST

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांकडून उपवासाच्या पदार्थाला मागणी वाढली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पिंपरी

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांकडून उपवासाच्या पदार्थाला मागणी वाढली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पिंपरी बाजारात फळभाज्यांची आवक कमी झाली आहे. त्यामुळे भेंडी, भुईमुगाच्या शेंगा, बटाटे आणि रताळे यांच्या भावात वाढ झाली आहे.मान्सूनचे वेळेवर आगमन झाले. मात्र, जुलै सुरू झाल्यानंतरही पावसाने ओढ दिली आहे. यामुळे उत्पादन कमी झाल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. उत्पादन कमी असल्याने फळभाज्यांची आवकेत घट झाल्याचे विक्रते व व्यापा-यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. गावरान रताळी चवीला गोड आणि पौष्टिक असल्याने ग्राहकांची पसंती गावरान रताळ्यास जास्त आहे. गावरान रताळे ३५ ते ४० रुपये प्रति किलो, तर सटाणा रताळे ३० रुपये प्रति किलो दराने मिळत आहे. भुईमुगाच्या शेंगांची ४० ते ५० रुपये प्रति किलो दराने विक्री होत आहे. पिंपरी मंडईत फळांची आवाक चांगली आहे. त्यामुळे केळी, सरफरचंद, सीताफळ, मोसंबी, संत्री, पेरू व डाळिंबाची आवक पुरेशी आहे. त्यामुळे राज्यातील व परराज्यातून येणा-या फळांचे भाव स्थीर आहेत, असे व्यापा-यांनी सांगितले.हिरवी मिरची तेजीतपिंपरीतील मुख्य भाजी मंडईत काल मिरचीचे भावही तेजीत होते. आवक कमी झाल्याने मिरची प्रतिकिलो ८० रुपये होती. फळभाज्यांमध्ये भेंडी ४० रुपये, गवार ४० रुपये, टोमॅटो २० रुपये, तर बटाटा १० रुपये किलो दराने होता. फळामध्ये केळी ४० रुपये डझन, तर पपई ३० रुपये किलोने विक्री केली जात होती.मागील वर्षी एकादशीच्या काळात रताळ्याची आवक जास्त होती. त्यामुळे २० ते २५ रुपये किलोने विक्री केली जात होती. मात्र, यंदा उत्पादनच कमी झाल्याने मार्केटला मालच नाही. त्यामुळे आपोआप रताळ्याच्या दरामध्ये वाढ झाली आहे.- शांताबाई चव्हाण, भाजी विक्रेत्या