शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

खुलासा मागविल्याने दणाणले धाबे

By admin | Updated: July 3, 2017 03:15 IST

ठेकेदारांना झालेल्या कामाची बिले काढून देण्यासाठी महापालिकेचे मुख्य लेखापाल राजेश लांडे ३ टक्के रकमेची मागणी करीत आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : ठेकेदारांना झालेल्या कामाची बिले काढून देण्यासाठी महापालिकेचे मुख्य लेखापाल राजेश लांडे ३ टक्के रकमेची मागणी करीत आहेत. मुख्य लेखापालांच्या माध्यमातून ही मागणी केली जात असली तरी त्यामागे भाजपाचे दोन पदाधिकारी आणि स्थायी समितीच्या प्रमुख पदाधिकारी आहेत. अशी तक्रार प्रमोद साठे या कंत्राटदाराने ३ मे २०१७ ला पंतप्रधान कार्यालयाच्या पोर्टलवर नोंदवली. त्याची दखल घेऊन पंतप्रधान कार्यालयाने महापालिका आयुक्तांकडे खुलासा मागविला असल्याने शहरात खळबळ उडाली आहे. आतापर्यंतची बिले काढून देण्याच्या मोबदल्यात ठेकेदारांकडे ३ टक्के रक्कम मागणाऱ्या मुख्य लेखापाल लांडे यांची तक्रार पंतप्रधान कार्यालयाकडे दिली असल्याच्या वृत्ताने मागील आठवड्यात खळबळ उडाली. आता त्याची सविस्तर माहिती हाती लागली असून पंतप्रधान कार्यालयाकडे पाठविण्यात आलेल्या तक्रारीत भाजपाच्या दोन पदाधिकाऱ्यांसह स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे यांच्या नावाचा उल्लेख असल्याने हे प्रकरण आणखी चर्चेत आले आहे. २०१६-१७ या वर्षात ठकेदारांनी केलेल्या कामाची बिले अद्याप प्रलंबित आहेत. ३१ मार्च वर्षअखेरची कामे सुरू असल्याने ठेकेदारांची बिले काढण्यास विलंब झाला. अशी सबब पुढे करून बिले रोखण्यात आली होती. मात्र ठेकेदारांनी बिले मिळविण्यासाठी पाठपुरावा केला़ त्या वेळी विशिष्ट रक्कम अदा केल्याशिवाय बिले मिळू शकणार नाहीत, असे मुख्य लेखापाल लांडे यांनी स्पष्ट करताच, ठेकेदार हवालदिल झाले. ३ टक्के रकमेची मागणी केली जात असल्याचा आरोप करीत ठेकेदार साठे यांनी ही तक्रार थेट पंतप्रधानांच्या संकेतस्थळावर नोंदवली आहे. दोषींवर कारवाई करावी, असे साठे यांनी पंतप्रधान कार्यालयाकडे पाठविलेल्या तक्रारीत म्हटले आहे.बिले मंजूर करण्यासाठी महापालिकेत ठेकेदारांकडून मुख्य लेखापाल तीन टक्के रक्कम मागतात. त्यात स्थायी समिती अध्यक्षा, तसेच भाजपाच्या अन्य दोन पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे, अशा आरोपाची तक्रार पंतप्रधान कार्यालयाकडे एका ठेकेदाराने केली आहे. आरोपात काही तथ्य नाही. ठेकेदारांनी बिले वेळेत दिली नाहीत. त्यामुळे त्यांना बिले मिळण्यास विलंब झाला आहे. मुख्य लेखापाल तीन टक्क्यांसाठी अडवणूक करीत असतील, तर तक्रारकर्त्यांनी सबळ पुरावे द्यावेत. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार देऊन अशा लोकांना रंगेहाथ पकडून द्यावे. अशा पद्धतीने थेट पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार नोंदविण्यामागील हेतू बदनामी करण्याचा आहे, हे निदर्शनास येते. - सीमा सावळे, स्थायी समिती अध्यक्षा