शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

बंद बसमुळे चिंचवडला वाहतूककोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2016 00:58 IST

पीएमपीएमएल’ बसचा टायर फुटल्याने नादुरुस्त झालेली बस तब्बल आठ तास उलटल्यानंतरही रस्त्यात न हटविल्याने चिंचवडमधील कै. बाबुराव गेणबा चिंचवडे चौकात

चिंचवड : ‘पीएमपीएमएल’ बसचा टायर फुटल्याने नादुरुस्त झालेली बस तब्बल आठ तास उलटल्यानंतरही रस्त्यात न हटविल्याने चिंचवडमधील कै. बाबुराव गेणबा चिंचवडे चौकात वाहतुकीचा खोळंबा झाला. यामुळे ‘पीएमपी’ प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाटयावर आला. सोमवारी दुपारी एकच्या सुमारास चिंचवडगाव ते कात्रज (एमएच १४ सी डब्लू ३०२८) या क्रमांकाच्या बसचे पुढील चाक अचानक खराब झाले. चिंचवडे चौकात अचानक घडलेल्या घटनेत प्रसंगावधान दाखवत चालकाने बस रस्त्याच्या कडेला घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही बस पूर्णपणे बाजूला घेता आल्याने बसचा काही भाग रस्त्यात होता. या प्रकाराची माहिती चालकाने संबंधित कार्यालयात दिली. त्यावेळी रस्त्यात बंद असणारी बस काढण्या साठी कर्मचारी पाठविले आहेत, असे उत्तर देण्यात आले. मात्र, बराचवेळ येथे कोणीही फिरकले नाही. या बंद पडलेल्या बसमुळे या मार्गावरील वाहतूक व्यवस्था कोलमडली. परिसरातील रहिवाशी या प्रकारामुळे संतप्त झाले. रात्री नऊपर्यंत बंद असणारी बस तशीच होती. या बसचे चालक वारंवार कार्यालयाशी संपर्क साधत होते. मात्र, त्यांना उडवा-उडवीची उत्तरे मिळत होती. वाहतूक पोलीस वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत होते. वारंवार संपर्क करूनही बस दुरुस्ती साठी कोणीही येत नसल्याने वाहतुकीचा बोजवारा उडाला. यावरुन प्रशासनाला गांभीर्य नसल्याचे स्पष्ट झाले. ठेकेदारांच्या बस असल्याने अडचणी निर्माण होतात.पीएमपी प्रशासनात अनेक ठेकेदारांच्या बस मार्गावर धावत असतात. या बस मार्गावर बंद पडल्यास पर्यायी व्यवस्था केली जात नाही. अशा अनेक घटना वारंवार घडत असतात. या प्रकारा बाबत योग्य नियोजन करावे अशी नागरीकांची मागणी आहे. दरम्यान पीएमपीच्या थांब्यामध्ये अनेक बस नादुरुस्त आहेत. केवळ त्या रस्त्यावरून कामापुरत्याच धावतात. या बस वाहतुकीसाठी पीएमपीने भाडेतत्त्वावर घेऊ नयेत अशी प्रवाशांची मागणी आहे. परंतु या कडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. आधीच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नाही. त्यातच बस बंद पडण्याचे प्रकार घडत असल्याने नागरिकांना त्रास होत आहे.(वार्ताहर)