शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

नदीपात्रात वाहन धुतल्यास दंड, महापालिका अधिकाऱ्यांना आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 01:59 IST

पवना नदीच्या रावेत येथील जाधव घाटावर नदीपात्रात वाहने धुण्याचे प्रकार बिनदिक्कत सुरू होते. याबाबत ‘लोकमत’ने सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले. त्याची दखल घेत महापालिका प्रशासनाने जाधव घाटावर चर खोदून वाहनांना घाटावर प्रवेशास प्रतिबंध केला आहे.

रावेत : पवना नदीच्या रावेत येथील जाधव घाटावर नदीपात्रात वाहने धुण्याचे प्रकार बिनदिक्कत सुरू होते. परिणामी नदीपात्रात प्रदूषण वाढले आहे. त्यामुळे वाहने धुणाºया वाहनचालकांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत होती. मात्र महापालिकेने त्याकडे दुर्लक्ष केले होते. याबाबत ‘लोकमत’ने सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले. त्याची दखल घेत महापालिका प्रशासनाने जाधव घाटावर चर खोदून वाहनांना घाटावर प्रवेशास प्रतिबंध केला आहे.जाधव घाटावर वाहनचालक वाहने धुण्यासाठी गर्दी करत होते. त्यामुळे नदीपात्रातील पाणी प्रदूषित होऊन पाण्यातील जैव साखळीवर गंभीर परिणाम झाला आहे. अनेक जलचर प्राण्यांच्या संख्येमध्ये झपाट्याने घट झालेली आहे. वाढत्या नागरीकरणामुळे प्रदूषणाच्या दृष्टिकोनातून पवनेचे नदीपात्र धोकादायक पातळीपर्यंत पोहोचले असताना प्रशासनाने या घाटावर कपडे धुण्यासाठी आणि चारचाकी, दुचाकी आदी वाहनांना प्रवेशास आणि नदीपात्रात वाहने धुण्यास घाटावर चर खोदून निर्बंध घातले आहेत.नदीपात्राचे झाले होते वॉशिंग सेंटरवाहनचालकांनी आपली वाहने घाटावर धुण्यास सुरवात केली होती. जलप्रदूषण ही मोठी समस्या बनली आहे. प्रशासकीय यंत्रणे ने आपल्या अधिकाराचा वापर करून या लोकांवर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. घाटावर दररोज वाहने, कपडे, जनावरे धुण्यामुळे पात्र प्रदूषित होत चालले होते. वाहत्या पाण्याबरोबर प्लॅस्टिक, जलपर्णी, कचरा येतो. त्यामुळे नदीपात्राचे प्रदूषण होत असताना वाहने धुण्यामुळे प्रदूषणात वाढ होत होती. सततच्या वाहने धुण्याने नदीपात्राचे वॉशिंग सेंटर झाले होते. प्रशासनाने नदी पात्रांचे सर्वेक्षण करून त्या परिसरामध्ये नागरिकांना वाहने धुण्याकरिता किंवा कपडे धुण्याकरिता कायमस्वरूपी प्रतिबंध करण्यासाठी कडक पावले उचलली आहेत.दंडात्मक कारवाईचा आदेशमहापालिकेच्या ‘ब’ प्रभाग अध्यक्षा करुणा चिंचवडे यांनी याबाबत संबंधित अधिकाºयांना आदेश दिले आहेत. नदीपात्रात वाहने धुणाºया वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत. घाटाकडे जाणाºया सर्व मार्गांवर मोठा चर खोदण्यात आला आहे. त्यामुळे नदीपात्र आणि घाटाकडे वाहनचालकांना वाहने घेऊन जाता येणार नाही.रसायनांमुळे नदीपात्र प्रदूषितनदीपात्रामध्ये दिवसेंदिवस इतर कारणांबरोबरच वाहनेधुणाºयांच्या संख्येमध्ये दुपटीने वाढ होत होती. जड वाहनांबरोबरच, दुचाकी, तीनचाकी, बस, ट्रॅक्टर, जीप, ट्रॅव्हलर, एसयुव्ही कार, टेम्पो, हलकी वाहने, घाटावर बिनधास्तपणे धुतली जात होती. कॉस्टिक सोडा, निरमा, साबण, लिक्विड सोप तसेच शाम्पू पुड्यांचा वापर वाहने धुण्यासाठी केला जातो. यात रसायने असतात.त्यामुळे नदीपात्रातील पाणी प्रदूषित होत होते. त्यामुळे पाणी प्रदूषणामध्ये खूप वाढ झालेली आहे. पवना नदी पात्राच्याअशा प्रदूषित पाण्यामुळे शहरामध्ये साथीच्या रोगांमध्ये वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड