शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

कामशेत-पवनानगर रस्त्याची दुरवस्था

By admin | Updated: July 15, 2016 00:13 IST

पवनानगर-कामशेत या पवन मावळामधील ४० गावांना जोडणाऱ्या सुमारे १२ किलोमीटर लांबीच्या मुख्य रस्त्याची दुरवस्था झाली आहे.

पवनानगर : पवनानगर-कामशेत या पवन मावळामधील ४० गावांना जोडणाऱ्या सुमारे १२ किलोमीटर लांबीच्या मुख्य रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्याला साइटपट्टीदेखील नाही. यात या आठवड्यात झालेल्या पावसात या रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. प्रवासासाठी दुप्पट वेळ लागत आहे. खड्ड्यांमुळे अनेक छोटे अपघात होत आहेत. कामगारांना कामावर जायला आणि विद्यार्थ्यांना शाळेत जायला उशीर होतो. रस्त्याची अवस्था दयनीय होऊनही सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष आहे. या रस्त्याचे खडे ताबडतोब बुजवावे व रस्त्याच्या कडेला पाणी जायला जागा करून रस्त्याला साइडपट्टी कराव्यात, अशी मागणी अ‍ॅड. भरत ठाकर प्रतिष्ठानने केली आहे. प्रतिष्ठानचे किसनराव खैरे, संदीप भुतडा, विश्वनाथ जाधव, गणेश ठाकर, शिवाजी सुतार, नवनाथ ठाकर, मनोहर तुपे, संजय केदारी, सचिन ठाकर, बबन कालेकर, संतोष ठुले यांनी केली आहे. उर्से : पवन मावळातील सोमाटणे-परंदवडी या मुख्य रस्त्याची अवस्था दयनीय झाली असून, जागोजागी खड्डे पडले आहेत. पवन मावळातील दहा-बारा गावांना जोडणारा मुख्य रस्ता म्हणून परंदवडी-सोमाटणे हा रस्ता ओळखला जातो. गेल्या दहा वर्षांत या दोन्ही गावांबरोबरच इतर गावांचाही चांगला विकास झाला आहे. गावात मोठमोठ्या इमारती उभ्या राहत आहेत.परिसरात अनेक शिक्षण संस्था कार्यरत झाल्या आहेत. यामुळे मुख्य रस्त्यांवरून दररोज मोठ्या प्रमाणावर वाहनांची ये-जा चालू असते. मात्र, खराब व खड्डेमय रस्त्यांच्या अवस्थेमुळे वाहनचालकांना याचा खूप त्रास होत आहे. वाहनांचा वेगही खूप मंदावलेला असतो. सध्या पावसामुळे रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने वाहनचालकांना अंदाज येत नसल्याने अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. नुकताच उर्से रस्त्याचे काम झाल्याने या रस्त्याचा प्रश्न सुटला आहे. मात्र, याला लागूनच हा रस्ता असल्याने हाही रस्ता होईल, अशी अपेक्षा ग्रामस्थांना होती. पण, ती फोल ठरल्याने रस्त्याचे का डांबरीकरण करण्यात आले नाही, असा प्रश्न येथील नागरिकांनी केला आहे. रिक्षाचालकांना तर हे खड्डे डोकेदुखी वाढवत आहे. प्रवाशांनादेखील याचा त्रास सहन होत असल्याने अनेक जण या खासगी वाहनांना टाळत आहेत. (वार्ताहर)