भोसरी : वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करून टेम्पो चालविल्याने एकास ठोकर बसली. या अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला. या प्रकरणी टेम्पोचालक गणेश संभाजी दोरकर (वय ३२, भोसरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंद्रायणीनगर येथे टपरीजवळ थांबलेल्या एका व्यक्तीला टेम्पोची जोरदार धडक बसली. जबर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर माहिती न देता वाहनचालक पळून गेला. मारुती तळेकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी एमआयडीसी पोलिसांकडे गुन्हा दाखल केला आहे. शहरामध्ये भरधाव वेगात वाहने चालविल्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात झाले आहेत. अपघाताच्या घटनांमध्ये वाहनचालकांच्या चूका आहेत. अनेकजणांना जायबंदी व्हावे लागले. तर काही जणांना प्राणाची किंमत मोजावी लागली. या घटना रोखण्यासाठी वाहतूकीचे नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. परंतु त्याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे.(वार्ताहर)
वाहनचालकावर अखेर गुन्हा दाखल
By admin | Updated: July 7, 2016 03:30 IST