शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरला मारहाण करणाऱ्यावर गुन्हा, कायदेशीर कारवाईनंतर पिंपरीतील डॉक्टरांचे आंदोलन मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 05:14 IST

डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे रुग्ण दगावल्याचा आरोप करीत रुग्णाच्या नातेवाइकाने डॉक्टरला मारहाण केली. त्याच्या निषेधार्थ पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न रुग्णालयात डॉक्टरांनी आंदोलन केले.

पिंपरी : डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे रुग्ण दगावल्याचा आरोप करीत रुग्णाच्या नातेवाइकाने डॉक्टरला मारहाण केली. त्याच्या निषेधार्थ पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न रुग्णालयात डॉक्टरांनी आंदोलन केले. काम बंद आंदोलनाचा पवित्रा घेतलेल्या डॉक्टरांची रुग्णालय व्यवस्थापनाने समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, संबंधितांवर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी आग्रही भूमिका डॉक्टरांनी घेतली. अखेर सायंकाळी पिंपरी पोलिसांनी डॉक्टरवर हल्ला करणाºयाविरोधात गुन्हा दाखल केला.पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात केतक अशोक गायकवाड (वय २६, रा. एचए वसाहत) या तरुणाला सोमवारी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रुग्णाचा अचानक मृत्यू कसा झाला, याबाबत नातेवाइकांनी डॉक्टरांकडे विचारणा केली. त्या वेळी त्यांना समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाला, असा आरोप रुग्णाच्या नातेवाइकांनी केला. एका नातेवाइकाने चिडून डॉक्टरलाच मारहाण केली. जवळ पडलेल्या धारदार वस्तूने डॉक्टरवर हल्ला चढविला. त्यात डॉक्टर जखमी झाले. या घटनेमुळे रुग्णालयात काम करणारा डॉक्टर वर्ग संतप्त झाला. त्यांनी एकत्र येऊन शनिवारी सकाळी काम बंद आंदोलन केले. पिंपरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) मसाजी काळे म्हणाले, ‘‘डॉक्टर्स प्रोटेक्शन अ‍ॅक्ट कलम ४ नुसार डॉक्टरला मारहाण करणाºया आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला.’’- डॉक्टरांवर हल्ला करणाºया आरोपीवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असा निर्धार केला. दुपारपर्यंत डॉक्टरांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र डॉक्टर संबंधितावर कारवाई करण्याच्या मागणीवर ठाम होते. त्यांनी रुग्णालय व्यवस्थापनाला याबाबत सांगितले. शेवटी सायंकाळी या प्रकरणी डॉ. आदित्य पांडियाल यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड