शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

‘स्मार्ट वॉच’ तहकूब नको, रद्दच करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 03:00 IST

थेटपणे काम करणे येणार अंगलट : महापालिकेतील विरोधी पक्षाचे गटनेते, सामाजिक कार्यकर्ते आक्रमक

पिंपरी : स्वच्छ भारत अभियानाच्या नावाखाली महापालिकेच्या वतीने स्मार्ट वॉच माथी मारण्याचे काम सुरू आहे. अनेक महापालिकांमध्ये अपयशी ठरलेली योजना माथी मारण्याचा घाट कशासाठी, असा प्रश्न उपस्थित होत असून, स्मार्ट वॉचमधून होणारी जनतेच्या पैशांची लूट थांबवावी, अशी मागणी सर्वपक्षीय गटनेत्यांनी केली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. पारदर्शक कारभाराच्या नावाखाली थेट पद्धतीने काम देण्याचा पायंडा पाडला जात आहे. त्यास सर्वपक्षीय नेत्यांनी विरोध दर्शविला आहे. महापालिका आणि खासगी आरोग्य कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ही खरेदी होणार आहे. नागपूरमध्ये बंद पडलेला पॅटर्न पिंपरीत राबविण्याचा घाट आहे. दरांमध्ये तफावत असण्याबरोबरच प्रत्यक्ष कामाचे आॅडिट त्यातून होणार नसल्याचे जाणकारांचे मत आहे. निविदाप्रकियेला फाटा देण्याचे गौडबंगाल काय, असे प्रश्न उपस्थित होतात. थेट पद्धतीने वॉच खरेदी करण्यातून कोट्यवधींचा गैरव्यवहार करण्याचे प्रशासनाचे धोरण आहे. असे असताना महापालिकेतील विरोधी पक्ष केवळ पत्रक काढण्यापलीकडे काहीही करीत नसल्याचे दिसून येत आहे. स्मार्ट वॉचच्या नावाखाली लूट सुरू आहे, असे वृत्त लोकमतने प्रसिद्ध केल्यानंतर सर्वपक्षीय नेत्यांनी त्यास विरोध दर्शविला आहे.साने म्हणाले, ‘‘स्वच्छता ठेकेदारांना मनपाने ठेका दिलेला आहे. त्यासाठी लाखो रुपये मोजत आहे. या खासगी स्वच्छता कामगारांना स्मार्ट घड्याळे कशासाठी पुरविण्यात येत आहेत? ही जबाबदारी ठेकेदारांची आहे, निविदा रद्द करावी.’’अ‍ॅड. सागर चरण म्हणाले, ‘‘सफाई कामगारांना योग्य साधने उपलब्ध नसतानाच महापालिका कर्मचाºयांसाठी कोट्यवधी रुपये खर्चून ‘स्मार्ट वॉच’ घेण्याचा प्रस्ताव तहकूब ठेवण्यात आला आहे. तो कायमचा रद्द करण्यात यावा, महापालिका कर्मचाºयांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आयुक्तांनी स्थायी समितीसमोर ‘स्मार्ट वॉच’चा प्रस्ताव ठेवला होता. वॉचवर कोट्यवधींचा खर्च होत आहे. मात्र, दुसºया बाजूला सफाई कामगारांना बूट, हातमोजे दिले गेले नाहीत. त्यांना मूलभूत सुविधा नसताना महापालिका प्रशासन अशा स्मार्ट वॉचवर कोट्यवधी रुपये उधळत आहे. त्यातही अशा थेट पद्धतीने हे साहित्य खरेदीला विरोध आहे.’’तक्रारी बेसुमार : थेटपणे काम कशासाठी?सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर म्हणाले, ‘‘शहराची वाढतीलोकसंख्या आणि वाढत्या विस्तारामुळे महापालिकेने साफसफाईकामी बाह्यस्रोतांचा (आउटर्सोसिंग) अवलंब सुरु केला आहे. आरोग्यकामकाजावर कोट्यवधी रुपयांचा खर्च होऊनही तक्रारींचीसंख्या मात्र बेसुमार आहे. काही सफाई कामगारांच्या कामचुकारपणामुळे सर्वच कामगारांवर ताशेरे ओढले जातात. घनकचरा व्यवस्थापनांतर्गतया स्मार्ट वॉचची खरेदी केली जाणार आहे. काही कामचुकारकर्मचाºयांमुळे ही खरेदी होत आहे. मात्र एक-दोन टक्केकर्मचाºयांमुळे सर्वच कर्मचाºयांवर अविश्वास दाखवणे योग्यनाही. चढ्या दराने खरेदी होऊन महापालिकेचे कोट्यवधींचे नुकसानहोण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्मचाºयांना मूलभूत सुविधा व अत्यानुधिक उपकरणे पुरवावीत.’’आरोग्य विभागासाठी स्मार्ट वॉच थेट पद्धतीने खरेदीचा प्रयत्न आहे. कोणाला तरी डोळ्यांसमोर ठेवून ही निविदा काढली आहे. घड्याळे थेट पद्धतीने उपलब्ध करून घेण्यासाठी घाई कशासाठी? निविदा मागविणे अपेक्षीत होते.-दत्ता साने, विरोधी पक्षनेतामहापालिकेत स्मार्ट वॉचचा नागपूर पॅटर्न राबविण्याचे धोरण आहे. तातडीची बाब म्हणून ‘स्मार्ट वॉच’ थेट पद्धतीने खरेदी करण्याचे नियोजन आहे. थेट पद्धतीने खरेदीचा घाट कशासाठी घातला जातोय.-सचिन चिखले, मनसे गटनेतामहापालिकेतील आरोग्याचे तीन तेरा वाजले आहेत. सत्ताधाºयांमधील गोंधळामुळे निविदाप्रक्रिया पूर्ण झालेली नाही. त्यामुळे घरोघरचा कचरा उचलण्याचे काम सक्षमतेने होत नाही. कंपनी, ठेकेदार पोसण्याचे धोरण आहे.- राहुल कलाटे, शिवसेना गटनेता

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड