शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

प्राध्यापकांवर स्वायत्तता लादू नये

By admin | Updated: March 23, 2017 04:16 IST

स्वायत्तता मिळालेल्या महाविद्यालयांना समाजाच्या विकासासाठी अनेक गोष्टी करता येऊ शकतात. परंतु, शिक्षण संस्थांनी आपल्या प्राध्यापकांवर स्वायत्तता लादू नये.

स्वायत्तता मिळालेल्या महाविद्यालयांना समाजाच्या विकासासाठी अनेक गोष्टी करता येऊ शकतात. परंतु, शिक्षण संस्थांनी आपल्या प्राध्यापकांवर स्वायत्तता लादू नये. तसेच शासनाने महाविद्यालयांवर अधिक विश्वास ठेवून प्राध्यापकांची पदभरती करण्यासाठी परवानगी द्यावी. संस्थांनी केलेली भरती शासनाने नंतर तपासून पाहावी, त्यामुळे महाविद्यालयांच्या शैक्षणिक विकासाला चालना मिळेल, असे मत डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे व परिषदेचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. कुंटे म्हणाले, जगभरातील विद्यापीठांमध्ये विद्यापीठीय शिक्षण आणि उद्योग यांचा एकमेकांशी समन्वय असल्याचे दिसून येते. मात्र, असे वातावरण भारतात फारसे दिसून येत नाही. विद्यापीठांचा आकार लहान असला आणि उद्योगांनी सहकार्य ठेवले तर संशोधन क्षमतेमध्ये नक्कीच वाढ झालेली दिसून येईल.शिक्षण संस्थांमध्ये काम करणाऱ्यांना उत्तेजन आणि काम न करणाऱ्यांना शिक्षा दिली तरच शिक्षण संस्थांमध्ये गुणात्मक बदल होऊ शकतात. तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये आलेली निष्क्रियता झटकणे, हा महाविद्यालयांच्या विकासाचा एकमेव मार्ग आहे. सध्या विनाअनुदानित तत्त्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांवरच अनुदानित महाविद्यालये सुरू आहेत. आधुनिक काळातील बदलनानुसार शिक्षकांना प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. त्यामुळे वर्षातून एकदा प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण होणे गरजेचे आहे, असे नमूद करून कुंटे म्हणाले, प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान देऊ नये. तर पुस्तकाबाहेरील आणि जीवनात उपयुक्त पडणारे ज्ञानही दिले पाहिजे. ग्रंथालयातील पुस्तकांबरोबच आधुनिक तंत्राचा ज्ञान वापर प्राध्यापकांनी केला पाहिजे. स्वायत्त महाविद्यालयांचा समाजासाठी उपयोग कसा करून घेता येईल याची दृष्टी संबंधित संस्थेच्या व्यवस्थापनाकडे असल्यास अनेक चांगल्या गोष्टी करता येऊ शकतात. मात्र, त्यामुळे पूर्वीच्या यंत्रणेवर ताण पडणार आहे. याची खात्री बाळगली पाहिजे. प्राध्यापकांना विश्वासात घेऊन स्वायत्ततेचा निर्णय घेणे अपेक्षित आहे.समाजाची गरज भागविण्यासाठी शिक्षण संस्थांनी आवश्यक बदल केले पाहिजेत. या मानसिकतेतून प्राध्यापकांनी काम करणे आवश्यक आहे, असे स्पष्ट करून कुंटे म्हणाले, फर्ग्युसन महाविद्यालयातील प्राध्यापकांची बैठक घेण्यात आली. त्यानंतर त्यांना शक्य असलेल्या गोष्टींवर काम करण्यास सांगण्यात आले. स्वायत्तता घेतल्यामुळे महाविद्यालयाच्या संशोधनात वाढ होणार आहे.राज्य शासन व केंद्र शासनाच्या मदतीने महाविद्यालयात अधिक चांगल्या गोष्टी केल्या जाऊ शकतात. शिक्षण क्षेत्रात कोणतेही बदल त्वरित होत नाहीत. तुमची दिशा निश्चित असेल तर शिक्षण क्षेत्रातही योग्य बदल घडू शकतात. फर्ग्युुसन पाठोपाठ आता बीएमसीसीलाही लवकरच स्वायत्तता मिळेल. त्यादृष्टीने संस्थेचे प्रयत्न सुरू आहेत. समाजाला पुढे घेऊन जाण्यासाठी रोजगाराभिमुख, संशोधनाला चालना देणारे आणि नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम राबविल्याशिवाय विद्यार्थी महाविद्यालयात येणार नाहीत, असेही कुंटे म्हणाले. महाविद्यालयांमधील उपकरणे एकत्र आणून फर्ग्युसन महाविद्यालयांमध्ये उत्तम संशोधन केंद्र सुरू करण्याच्या दिशेने पाऊल टाकण्यात आले आहेत, असे नमूद करून कुंटे म्हणाले, महाविद्यालयांनी आपल्यातील कमतरता ओळखून त्या दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. संशोधनाला गती देण्यासाठी महाविद्यालयात ‘रिसर्च कल्चर’ तयार होणे आवश्यक आहे. प्राध्यापकांच्या तुटवड्यामुळे महाविद्यालये चालवणे कठीण जात आहे. त्यामुळे शासनाने प्राध्यापकांच्या भरतीबाबत महाविद्यालयांवर विश्वास टाकण्याची गरजेचे आहे. याकडेही त्यांनी लक्ष वेधले.