शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणशुल्क कायद्यातील दुरुस्तीचा विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 02:53 IST

शाळांनी अवाजवी शुल्कवाढ करूनही त्यांच्यावर शुल्क नियंत्रण कायद्यानुसार काहीच कारवाई शिक्षण विभागाला करता येत नसल्याने या कायद्यात दुरुस्ती केली

पिंपरी : शाळांनी अवाजवी शुल्कवाढ करूनही त्यांच्यावर शुल्क नियंत्रण कायद्यानुसार काहीच कारवाई शिक्षण विभागाला करता येत नसल्याने या कायद्यात दुरुस्ती केली, अशी घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केली होती. मात्र, शुल्कवाढीविरोधात होणारी आंदोलने ओसरताच या दुरुस्तीचा विसर शासनला पडला आहे. त्यामुळे शाळांच्या नफेखोरीला अटकाव कधी होणार, असा प्रश्न पालकांना पडला आहे.शाळांनी अवाजवी शुल्कवाढ केल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्यास संबंधित शाळेची मान्यता रद्द करण्याची तरतूद शुल्क नियंत्रण कायद्यात करण्यात आलेली आहे. मात्र हजारो विद्यार्थी शिकत असलेल्या शाळांची मान्यता रद्द केल्यास त्या विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणाची काय व्यवस्था करायची, याचा गंभीर प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे आतापर्यंत शुल्कवाढ केली म्हणून एकाही शाळेची मान्यता रद्द करण्याची कारवाई करण्यात आलेली नाही. त्याचबरोबर शुल्क नियंत्रण समितीकडे दाद मागण्याचा अधिकार केवळ शाळेतील पालक-शिक्षक सभेलाच (पीटीए) आहे. कोणताही पालक वैयक्तिक पातळीवर शुल्क नियंत्रण समितीकडे तक्रार दाखल करू शकत नाही. बºयाचदा पालक -शिक्षक सभेमध्ये शिक्षकांची वर्चस्व निर्माण होत असल्याने शुल्कवाढ करणाºया शाळांविरोधात समितीकडे तक्रारीच दाखल होत नाहीत.