शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

दिवाळीच्या तोंडावर डाळी महाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 03:19 IST

किराणा, कपडे खरेदीस गर्दी; पिंपरी, उपनगरातील बाजापेठेत कंदील दाखल

पिंपरी : दिवाळीचा फराळ करण्यासाठी लागणाऱ्या साहित्य खरेदीची लगबग सुरू झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेमध्ये यंदा किराणा स्वस्त झाला आहे, तर अनेक साहित्याचे दर गेल्या वर्षीप्रमाणेच आहेत. सरकारने अन्न-धान्यावरील कर माफ केला आहे. तसेच इतर खाद्यपदार्थांवरील कर माफ केल्याने फराळासाठी लागणाºया किराणा मालाचे दर काही प्रमाणात कमी झाले आहेत. दिवाळीच्या तोंडावर डाळी महागल्या आहेत.दिवाळी म्हटले की फराळाची मेजवानी ठरलेली असते. अनेक वेळा किराणा मालाच्या वाढलेल्या किंमतीमुळे फराळासाठी लागणाºया साहित्याची खरेदी करताना दिवाळे निघते. मात्र या वर्षी काही साहित्यांचे दर थोड्या प्रमाणात कमी झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. दिवाळीच्या तयारीसाठी दसºयापासूनच भुसारबाजारातील विक्रेत्यांनी तयारी सुरू केली आहे. अनेक गृहिणींची फराळ बनविण्याची लगबग सुरू झाली आहे. दिवाळीला अवघे सात दिवस बाकी आहेत. त्यामुळे पिंपरीतील अनेक किराणा माल विक्रेत्यांची दुकाने गर्दीने ओसंडून वाहत आहे.दिवाळीचा सण म्हणजे खिशाला कात्री लावणारा सण समजला जातो. मात्र वर्षातून एकदा येणारा सण म्हणून मागे-पुढे न पाहता खरेदी केली जाते. त्यामुळे प्रत्येकवर्षी दिवाळीमध्ये दिवाळे निघते. मात्र यंदाची दिवाळी सर्वसामान्यांना दिलासा देणारी आहे. मागील वर्षी केंद्र सरकारने दिवाळीपूर्वी जीएसटीमध्ये फेरबदल केले होते. त्यानुसार अन्नधान्यावरील कर मागे घेण्यात आले होते. तसेच इतर साहित्यावरील कर १५ टक्क्यांवरुन ५ टक्के करण्यात आला. त्याचा सकारात्मक परिणाम या दिवाळीमध्ये पाह्यला मिळत आहे. बेसनपीठ, चणाडाळ यांचे दर कमी झाले आहेत. तर दगडी पोहे, भाजके पोहे, खसखस, मुरमुरे यांचे दर गेल्यावर्षीप्रमाणेच आहेत. सुक्या खोबºयाची आवक कमी झाल्यामुळे खोबरे महागले आहे. सुक्या मेव्याचे भाव काही प्रमाणात वाढले आहेत. फराळ तयार करण्यासाठी लागणाºया खाद्यतेलाच्या किमती वाढल्या आहेत. डालड्याची आवक घटल्याने किंमत वाढली आहे.साहित्य आताचे दरमुरमुरे       ६०खसखस   ८००साखर        ४०तेल            ९०चणा डाळ  ६०खोबरे       २००शेंगदाणे     ९५बेसन पीठ  ६०मैदा           २८रवा            २८पिठीसाखर ४५मका पोहे    ४०दगडी पोहे ६०दिवाळीला सहा दिवस बाकी राहिले आहेत. त्यामुळे किराणा मालाच्या दुकानांमध्ये खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी वाढू लागली आहे. मात्र अजून बहुतांश नागरिकांचे पगार झाले नाहीत. एक तारखेनंतर पगार व बोनस मिळाल्यावर ग्राहकांची संख्या वाढेल. यंदा किराणा मालाची आवक चांगली झाली आहे. त्याचप्रमाणे सरकारने जीएसटीमध्ये फेरबदल केल्याचा प्रभाव जाणवू लागला आहे. त्यामुळे अनेक खाद्यपदार्थांच्या किंमती कमी झाल्या आहेत. त्यामुळे यंदा ग्राहकांचे खरेदीचे प्रमाणही वाढणार आहे.- कन्हैैया ओझा,किराणा मालविक्रेते.

टॅग्स :Diwaliदिवाळीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड