शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

सदस्यांवर अपात्रतेची टांगती तलवार

By admin | Updated: March 22, 2017 03:17 IST

चांदखेड ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मागासवर्गीय जागेवर निवडून आलेल्या विद्यमान सरपंचासह सात सदस्य निवडून आले.

वडगाव मावळ : चांदखेड ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मागासवर्गीय जागेवर निवडून आलेल्या विद्यमान सरपंचासह सात सदस्य निवडून आले. मात्र, सहा महिन्यांच्या आत त्यांनी जातवैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने त्यांच्यावर अपात्रतेची कारवाईची टांगती तलवार आली आहे. मावळ पंचायत समितीचे माजी सदस्य दत्तात्रेय माळी व अनिकेत कांबळे यांनी अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे या सात जणांच्या विरोधात अपील केले असून, त्याची सुनावणी २३ तारखेला आहे. चांदखेड ग्रामपंचायतीची निवडणूक २४ आॅगस्ट २०१६ रोजी पार पडली. २६ आॅगस्ट रोजी निकाल लागला. या ग्रामपंचायतीत ११ जागा असून, त्यात तीन नागरिकांचा मागासवर्ग, दोन अनुसूचित जमाती व दोन अनुसूचित जातीचे उमेदवार निवडून आले. या सात जणांनी हमीपत्रात दिल्याप्रमाणे सहा महिन्यांच्या आत जातवैधता प्रमाणपत्र सादर करायचे असते. परंतु, संबंधित सदस्यांनी मुदतीत अर्ज दाखल न केल्याने त्यांच्यावर टांगती तलवार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मागासवर्गीयांसाठी आरक्षित प्रभागातून निवडून आलेल्या सदस्याने सहा महिन्यांच्या आत जातवैधता प्रमाणपत्र सादर न केल्यास सदस्यत्व रद्द करण्याची कारवाईची तरतूद असून नुकतेच नगर जिल्ह्यातील ३४६ जणांचे, तर पाचगणीमधील गोडवली ग्रामपंचायतीच्या उपसरपंचासह तीन सदस्यांचे सदस्यत्व अप्पर जिल्हाधिकारी यांनी अपात्र ठरविले आहे. (वार्ताहर)